चंद्रभागा तीरी वैष्णवांचा मेळा; कार्तिकीसाठी 6 लाख भाविक पंढरपुरात

कार्तिकी एकादशी l पोहा मिळाला पंढरीसी ll येथील महिमा वर्णू पैसी l ब्रह्मांदिका न वर्णवे ll या संत उक्ती प्रमाने श्री विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा करत लाखो भाविकांनी हरिनामाचा जयघोष केला. वैष्णवांमुळे अवघी पंढरीनगरी दुमदुमली आहे. कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळयाला 6 लाख भाविक पंढरीत दाखल झाले. मंदिर परिसर, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भक्तीसागर परिसर गजबजून गेला होता.

कार्तिकी एकादशीला आलेल्या भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली आहेत. भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नानानंतर मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तितकीच गर्दी रांगेत उभारून पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी आहे. दर्शन रांगेतील 15 दर्शन शेडमध्ये एकादशी दिवशी सुमारे दीड लाखावर भाविक दर्शनाची प्रतीक्षा करत होते. दर्शन रांग सकाळी पत्राशेडच्या बाहेर पडून गोपाळपूरच्या पुढे दाखल झाली होती. दर्शन रांगेतील भाविकांना दर्शन मिळण्यास सुमारे 12 ते 13 तासांचा अवधी लागत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले. वारकऱयांची पहाटेपासूनच चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी झाली होती.

कार्तिकी यात्रेत चोऱया रोखण्यासाठी माऊली स्क्वॉड, 12 ठिकाणी वॉच टॉवर, 335 हून अधिक सीसीटीव्ही पॅमेरे, 7 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत पेंद्रे उभारण्यात आली होती. सुमारे 4 हजार 656 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

सुधाकर शिंदे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

कार्तिकी यात्रेत होणाऱया शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून मानाच्या वारकऱयांची निवड करण्यात आली. यामध्ये नांदेड जिह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता शिंदे यांची मानाचे वारकरी म्हणून निवड झाली. शिंदे दाम्पत्य गेल्या 11 वर्षांपासून नियमित वारी करत आहेत.

माझे जिवीची आवडी। पंढरपुरा नेईनगुढी।।

मुंबईतही कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबईतर्फे दादर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मार्पेट येथून निघालेल्या दिंडी सोहळय़ाची डी. l. वैद्य रोड येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात सांगता झाली. हजारो भाविक वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.

Comments are closed.