एकनाथ खडसेंवरच मुलाच्या खुनाचा आरोप; गिरीश महाजनांवर संतापले नाथाभाऊ, म्हणाले…
मुंबई : भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन (गिरीश महाजन) आणि राष्ट्रवादीचे आमदार एकेनाथ खदसे (एकनाथ खदसे) यांच्यातील शाब्दिक युद्ध सातत्याने पाहायला मिळते. हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. मात्र, सध्या हनी ट्रॅपप्रकरणातील आरोपी प्रफुल लोढा प्रकरणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली असताना गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंच्या मुलाचे हत्याप्रकरणच चर्चेत आणल्याने खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे समोर आले पाहिजे. खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला, असे प्रफुल लोढाने सांगितल्याचा दाखला गिरीश महाजन यांनी दिला होता. आता, महाजनांच्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली. हिंमत असेल तर या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करावी, अशी मागणी खडसेंनी केली आहे.
माझ्या मुलाच्या प्रकरणात गिरीश महाजनला आव्हान आहे की, माझ्या एकुलत्या एक मुलाच्या खुनाचा आरोप माझ्यावर करतात, हिमंत असेल तर तात्काळ याप्रकरणाची चौकशी करा, असे एकनाथ खडसेंनी म्हटलं. निखिल खडसेंचा मृत्यू झाला त्यावेळी 3 दिवस मी घरीच नव्हतो, त्याच्या मृत्यूच्या दिवशी देखील नव्हतो. माझ्याकडे जमिनी शिवाय काहीच नाही, गिरीश महाजन हा शाळा मास्तरचा पोरगा, मग याच्याकडे इतका पैसा कुठून आला? ह्याच्या जावयाच्या नावाने संपत्ती ठेवली आहे. ह्याचा तीन बत्ती येथे फ्लॅट आहे, तो किती किमतीचा आहे याची माहिती घ्या? असे म्हणत गिरीश महाजनांच्या मालमत्तेवर खडसेंनी सवाल उपस्थित केले आहेत.
दरम्यान, प्रफुल लोढावर आत्ताच कसे गुन्हे दाखल व्हायला लागले. अंधेरीला गुन्हा दाखल झाला, साकीनाका पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. एकाच डीसीपीच्या अंतर्गत गुन्हा दाखल कसा काय होतोय? असा सवालही एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे. सध्या लोढावर वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत, तीन ठिकाणी हनी ट्रॅफ प्रकरणात लोढावर गुन्हे दाखल आहेत.
गिरीश महाजन हनीट्रॅपमध्ये असल्याचा संशय – खडसे
गिरीश महाजन हॉटेल ट्रायडन येथे माझे तीन महिने पाय धरत होते असं प्रफुल लोढा यांनी म्हंटल आहे. नेमकं काय आहे ट्रायडेंट हॉटेल प्रकरण? असा प्रश्न विचारला असता, हनी ट्रॅपमधे गिरीश महाजन आहे, असा माझा संशय असल्याचे खडसे यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री यांच्याबाबत माझा राग नाही. नाशिकमधील व्यक्ती त्यांना माहिती आहे, हॉटेल देखील माहिती आहे. त्यामुळे त्यांनी याची चौकशी करा तात्काळ एसआयटी नेमा अशी माझी मागणी आहे, असेही खडसेंनी पत्रकार परिषदेत म्हटले.
हेही वाचा
वाल्मिकला झटका, बीड कोर्टाच्या निर्णयावर समाधान, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
आणखी वाचा
Comments are closed.