रवींद्र धंगेकरांनंतर शिंदेंचा पुण्यात ठाकरेंना धक्का, ‘फायरब्रँड’ नेत्याचा शिवसेनेते प्रवेश
पिंपरी : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे. पुण्यात माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी काही दिवसांपुर्वी काँग्रेसचा हात सोडत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला, त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील फायरब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे काल (बुधवारी) शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
या पक्षप्रवेशानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे. कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील फायरब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी काल (बुधवारी) शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी सुलभा उबाळे यांचे पुत्र अजिंक्य उबाळे यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुलभा उबाळे यांच्या पक्ष प्रवेशावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवडचे शहर प्रमुख निलेश तरस हे देखील उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघ पक्षाने सोडून दिल्यामुळे शहरात ठाकरे गटाचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुलभा उबाळे यांनी म्हटल आहे. सुलभा उबाळे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे.
सुलभा उबाळेंची राजकीय कारकीर्द कशी?
सुलभा उबाळेंनी 1992 मध्ये शिवसेना शाखा प्रमुख म्हणून राजकारणात पाऊल ठेवले होते.
1997 साली त्या नगरसेवक झाल्या.
1998 साली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याची धुरा सांभाळली.
2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी शिवसेना गटनेता, स्थायी समिती सदस्य म्हणून काम पाहिले.
2009 साली भोसरी विधानसभा निवडणुकीत अवघ्या 1272 मतांनी पराभव झाला होता.
2014 ते 2017 त्यांनी पुन्हा पक्षाच्या गटनेता म्हणून काम केले.
2014 पुन्हा भोसरी विधानसभा निवडणुकीत त्यांना भोसरी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला.
तसेच त्यांनी शिवसेना शहर संघटिका पिंपरी चिंचवड म्हणून 5 वर्ष काम पाहिलं आहे.
जिल्हा संघटिका म्हणून 2017 ते आजतगायत कार्यरत आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.