नकली मारला गेला, खरा सिंह कोणता हे UBT ला सापडले, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि टोला
मराठी : विधानसभा जिंकलो, 70 नगरपालिका जिंकलो, नकली को किया ढेर UBT को पता चला कोण असली शेर असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे तुम्हाला बघवलं नाही. अडीच वर्षे काम केलं म्हणून 232 आमदार युतीचे निवडून दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. इतर पदांपेक्षा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख सर्वात मोठी असल्याचे शिंदे म्हणाले.
शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात 65 ते 70 नगराध्यक्ष निवडून आले
शिवसेनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात 65 ते 70 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. कार्यकर्त्यांचं लाडक्या बहणीचे मनापासून अभिनंदन. लाडकी बहीण, लेक लाडकी, लखपती, मुलींना उच्च शिक्षण मोफत, आरोग्याबाबत अनेक योजना केल्या याचा मला आनंद आणि समाधान असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अडीच वर्षाच्या कालावधीत जी महाविकास आघाडीने स्थगिती दिली ते सगळे अडथळे दूर केले आणि महाराष्ट्र पुढे सरकल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकसभा विधानसभेप्रमाणे महापालिकेत महायुतीचा भगवा फडकला पाहिजे
माझी आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. अनेकांनी विरोध केला मात्र विरोध मोडून काढत योजना सुरू ठेवली. कोणताही माई का लाल योजना बंद करू शकत नाही. 2100 रुपये सुरु करणार, योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. विटा नगरपरिषदेवर पण भगवा फडकला याचा आनंद आहे. सभेला लाडक्या बहिणींची संख्या तिप्पट असते. आज मिळलेला विजय जनतेला समर्पित करायचा आहे. लोकसभा विधानसभेप्रमाणे महापालिकेत महायुतीचा भगवा फडकला पाहिजे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
लोकांनी कामाला महत्व दिलं आहे. कल्याण डोंबिवलीत गेली अनेक वर्षे काम करतोय. क्लस्टरच्या माध्यमातून धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न सोडवल्याशिवाय एकनाथ शिंदे राहणार नाही. क्लस्टर आणि SRA चा प्रस्ताव द्या. महाराष्ट्र नंबर एकला आहे हा महाराष्ट्र असाच पुढे घेऊन जायचा आहे म्हणून महापालिकेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. हजारो कोटींची कामे झाली आहेत. घरांचा विषय सोडवल्याशिवाय राहणार नाही. जी कामे केलीत ती लोकापर्यंत पोहचवली पाहिजेत असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आज असली कोण नकली कोण हे लोकांनी दाखवून दिले
मतदार याद्या तपासा, टीम म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करा. कार्यकर्ता म्हणून काम केलं तर कोणतीही निवडणूक अवघड नाही. सर्वसामान्य आपला केंद्रबिंदू आहे. संकट आपत्ती तिथे शिवसेना हे आपलं समीकरण आहे. शिवसेना वाढतेय. शिवसेना मुंबई ठाण्यापर्यंत मर्यादित नाहीतर शिवसेना आज चांदा ते बांदा पोहचली आहे. लोकांना बदल पाहिजे होता. तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झाला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेना शिस्तीचा पक्ष आहे ,लोकांच्या अडचणीत धावून गेलं पाहिजे. कार्यकर्त्यांना जपण्याचे काम पदाधिकरी नेत्यांनी केलं पाहिजे. कार्यकर्ता संकटात असतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहा. चाळीची डीम कवनवेन्स झाला नसेल तर त्यांना देखील न्याय मिळणार. आज शिवसेनेच्या इतिहासातला आनंदाचा दिवस आहे. असली नकली करत होते आज असली कोण नकली कोण हे लोकांनी दाखवून दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. जनता मालक मी सेवक आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले आज एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेली ते बोलत होते.
आणखी वाचा
Comments are closed.