मला तुमचा अभिमान…; ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेताच एकनाथ शिंदेंची पहिली प्
मराठी On Omraje Nimbalkar: गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना (Opration Tiger) अखेरीस पूर्णविराम मिळाला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय लोकांच्या विकासकामांसाठी घेतल्याचे सांगितले. यावेळी ओमराजे निंबाळकरांनी पवनसिंह निंबाळकर प्रकरणाचाही उल्लेख केला. निकाल विरोधात गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (मराठी) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा करून दिल्याचा दावाही ओमराजे निंबाळकरांनी केला.
ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया (मराठी On Omraje Nimbalkar) दिली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मला अभिमान आहे. स्वतःसाठी नाहीतर जनतेसाठी निःस्वार्थ काम करणारा हा लोकप्रतिनिधी खरा कडवट शिवसैनिक आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रामाणिकपणे जनतेचे काम करत आहे, अशा निःस्वार्थ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी मी कायम भक्कमपणे उभा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी सहभागी आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्यासाठी आणि जनतेचे प्रश्नं सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मी शिवसेनेत स्वागत करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा- (Uddhav Thackeray On Opration Tiger)
ठाकरेंच्या शिवसेनेतल्या सहा लोकसभा खासदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत. सर्व सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करतायत..या दौऱ्याची सुरूवात ईशान्य मुंबईतून झालीय. काल भांडूप आणि घाटकोपरमधील शाखांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं..बंडखोरी झाली आता सूड घ्यावाच लागेल..अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना इशारा दिला आहे.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले? (Omraje Nimbalkar On Uddhav Thackeray)
कुठलाही पक्ष असला तरी विरोध कायम असेल, सत्तेची ताकद घेऊन काम करू, अनेक कामं आज होत नाहीत. आज सगळ्या अपेक्षांना न्याय देण्याचे काम करेन, सामान्य माणूस मला ओळखतो. पैसे, किंवा पदासाठी मी जात नाही. माझ्याकडे सामान्य माणसे आहेत, मोठी कोणी नाहीत. मी शब्द देतो, सत्तेचा वापर सामान्य माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी काम करेल. माझे काम काहीच स्वतःचे नाही, सत्तेचा उपयोग कसा केला जातो हेही दाखवून देऊ, मी बोलण्यापेक्षा मी घेतलेला निर्णय कामातून दाखवेन, असं ओमराजे निंबाळकरांनी सांगितले.
संबंधित बातमी:
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Comments are closed.