बेधडक, मनाचे राजे, ओपनिंग बॅटसमन, एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंच्या फुटीर खासदारांवर कौतुकाचा वर्षाव

मराठी मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत  संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दाखल झालेल्या खासदारांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी प्रत्येक खासदाराचं कौतु केलं. संजय दिना पाटील यांना एकनाथ शिंदे बेधडक म्हणाले, तर  ओमराजे निंबाळकर हे मनाचे राजे असल्याचं शिदेंनी म्हटलं. यावेळी शिंदेंनी प्रत्येक खासदाराचं कौतुक केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले सर्व शिवसेना परिवार सभागृहात आहे. खऱ्या शिवसेना परिवारामध्ये आज कट्टर शिवसैनिक खासदार सहभागी झालेत.4 वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला,⁠तेव्हा 40आमदार सुरुवातीला होते. आता ⁠पुन्हा चौकार नाही आता षटकार मारला आहे. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आणि ⁠बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी,  ⁠धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जिथे शिवसेनेचे विचार तिथे शिवसैनिक यामुळं या खासदारांनी आपल्या परिवारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचं शिंदेंनी म्हटलं. ⁠काही लोकं मीडियावर चुकीचे आरोप प्रत्यारोप उलट सुलट चर्चा करत आहेत, असंही शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंकडून खासदारांचं कौतुक

बंडू जाधव हे तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे. ⁠जमिनीशी घट्ट नाळ जपणारा बांधिलकी जपणारा हा खासदार आहे, त्याला तिकडे बॉस म्हटलं जातं. ⁠संजय दिना पाटील बेधडक आणि दोस्ती यारीसाठी उत्तम आहे.⁠ संजय दिना पाटील हा दिनांचा कैवारी आहे. ⁠प्रत्येकात गुण आहेत, ओमराजे आपल्या मनाचे राजे आहेत ⁠पण त्यांनी एक निश्चय केला आहे. संजय देशमुख आहेत त्यांच्या वडिलाचंं नाव उत्तमराव आहे, त्यांना अधिक उत्तम काम करायचं म्हणून आपल्याकडे आले आहेत. ⁠आष्टीकर बिनधास्त आहे ते  ओपनिंग बॅटसमन आहेत. ⁠प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. भाऊसाहेब वाकचौरे आहेत त्यांच्या नावात वाघ आहे. हे स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले नाहीत, ⁠मतदार संघाला न्याय देण्यासाठी आलेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की  हे स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले नाहीत. ⁠मतदार संघाला न्याय देण्यासाठी आले आहेत. ⁠ओम राजे यांच्या वडिलांची केस होती त्याचा दुर्दैवी निकाल लागला.
⁠मी कालचं म्हटलं मी उभा आहे. ⁠आम्ही कोणाला अडवायला नाही, तुडवायला नाही आलो. ⁠पण बाळासाहेब ठाकरे बोललेत अंगावर आला की शिंगावर घ्या. अडीच वर्षांची परिस्थिती आपण पाहिली आहे अनेक कामं झाली आहेत. आम्ही जो निर्णय 2022 ला घेतला तो सर्व सामान्य जनतेने स्वीकारला, 40 आमदारांचे 60 केले. ⁠एक जण जरी निवडून आला नाही तर मी गावी जाऊन शेती करेनं, असं म्हटल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

Comments are closed.