जिन्याखाली शिजवलेला भात, पाली, झुरळे, किडे-मुंग्या… भिंतींना बुरशी! विद्यापीठातील अक्षय कॅटरर्स, चेंबूरचे भगवती स्टोअर्स, दादरचे मारियन हॉटेल, वांद्रेच्या ‘क्राफ्टपॅक्स’चा अन्न परवाना निलंबित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिजवलेला भात झाकणाशिवाय जिन्याखाली साठवून ठेवणे, बुरशी लागलेल्या भिंती, स्वयंपाकघरात शेवाळ, पाली-झुरळे-किडे-मुंग्यांचा वावर आणि कमालीची अस्वच्छता यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आज मुंबईतील चार आस्थापनांवर कारवाई केली. मुंबई विद्यापीठातील अक्षय केटरर्सचेंबूरचे भगवती स्टोअर्स, दादरचे मारियन हॉटेल आणि वांद्रेच्या ‘क्राफ्टपॅक्स हॉस्पिटॅलिटी’चा अन्न परवाना एफडीएने निलंबित केला.

तपासणीवेळी आढळलेल्या अन्य त्रुटी:

  • खाद्यपदार्थ बनवताना कृत्रिम रंग आणि आरोग्यास घातक ठरणाऱ्या मोनोसोडियम ग्लुटामेटयुक्त अजिनामोटोचा वापर

  • स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे काळवंडलेले खाद्यतेल

  • गंजलेली व अस्वच्छ उपकरणे

  • भाजी कापण्याच्या चाकूंवर धूळ व चरबी

  • स्वयंपाकघरात सांडपाण्याची दुर्गंधी

Comments are closed.