गेट वे ऑफ इंडियाच्या सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा, प्रवेशद्वारावरील बॅगेज स्कॅनर मशीन तीन महिन्यांपासून बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईवरील ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना दहशतवाद्यांच्या मुख्य टार्गेटपैकी एक असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या सुरक्षा व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेली बॅगेज स्कॅनर मशीन मागील तीन महिन्यांहून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ‘गेट वे’ परिसरात येणाऱया हजारो देशीविदेशी पर्यटकांच्या बॅगांची कोणतीही तपासणी न करताच त्यांना थेट आत प्रवेश दिला जात आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी समुद्र मार्गाने मुंबईत प्रवेश करीत ताज हॉटेल आणि गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठा रक्तपात घडवला होता. या घटनेनंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली होती. प्रत्येक पर्यटक व त्यांच्या सामानाची स्कॅनरद्वारे तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले होते, मात्र सध्या सुरक्षेच्या नियमांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे उघडकीस आले आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वारावरील बॅगेज स्कॅनर मशीन मागील तब्बल तीन महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. ही मशीन दुरुस्त करण्यासाठी प्रशासन उदासीन असतानाच पर्यायी व्यवस्था म्हणून पोलिसांकडूनही हाताने काटेकोर तपासणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

Comments are closed.