नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी विनायक राऊत आमच्या घरी यायचे…; सून गिरीजा राऊत
विनायक राऊत सून गिरीजा राऊत मराठी बातम्या: ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यासह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊतांची सून आणि नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्या पत्नी गिरीजा राऊत (Girija Raut) यांच्या तक्रारीनंतर ठाणे कापूरबावडी इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, राऊत कुटुंबातील सदस्यांनी अत्यंत क्रूरतेने तिच्या डोक्यावरील केस कापल्याचा आरोपही गिरीजा यांनी तक्रारीत केला आहे. या अघोरी कृत्यांमध्ये आणि जादूटोणा प्रकरणात राऊत कुटुंबासह फिरोज बाबा आणि काजी बाबाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. (Girija Raut On Vinayak Raut And Gitesh Raut)
गिरीजा राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत तिच्यासोबत घडलेली सगळी आपबिती सांगितली. विनायक राऊत हे कधीच आमच्यासोबत राहत नव्हते. आम्ही मुंबईत चाळीतल्या घरी राहायचो. विनायक राऊत दुसऱ्या पत्नीसोबत दुसऱ्या घरात राहतात. विनायक राऊतांनी दुसरं लग्न आणि दुसरं घर माझ्यापासून लपवलं, असंही गिरीजा राऊत म्हणाल्या. तसेच विनायक राऊत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आमच्या घरी यायचे. त्याव्यतिरिक्त मुंबईत आमच्या घरी कधीही यायचे नाही. फोन करुन मला तू ही जबाबदारी घेतली पाहिजे, तू हे केलं पाहिजे, असं सांगायचे, अशी माहिती गिरीजा राऊत यांनी दिली.
माझे वागणे, कपडे घालणे सगळ्यांवर बंधनं होती- गिरीजा राऊत (Girija Raut On Vinayak Raut And Gitesh Raut)
विनायक राऊतांची राजकीय पार्श्वभुमी स्ट्राँग असल्यामुळे मी आधी तक्रार केली नाही. विनायक राऊतांनी कुटुंबप्रमुखाची जबाबदारी घेत कधीच त्यांच्या पत्नी मुलाला समजावलं नाही. अघोरी कृत्य करणारे सगळे बाबा सिंधुदुर्गाच्या आसपासचे आहेत. कधीतरी परिस्थिती सुधारेल असं वाटलं होतं. 7 वर्षं छळ गेला, माझे केस ओढत मला त्रास दिला, असा आरोप गिरीजा राऊत यांनी केला. खोटं बोलून 7 वर्ष माझ्या कुटुंबाचा घात केलाय. लैंगिक संबंध ठेवण्यासाठी गितेश सक्षम नाही, त्यामुळे तो आणि त्याची आई माझ्यासोबत अत्यंत वाईट वागले. माझे वागणे, कपडे घालणे सगळ्यांवर बंधनं होती. त्याची आई जशी आहे तसे मला वागायला लावले. गितेश राऊत हा घरात वेगळा वागतो आणि बाहेर वेगळा वागतो. आईला, मला घाण शिव्या देतो, बाहेर कुणाला सांगूनही पटणार नाही की ही व्यक्ती अशी आहे, असं गिरीजा राऊत म्हणाल्या.
विनायक राऊतांनी सगळे आरोप फेटाळले- (Vinayak Raut On Girija Raut)
मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे, अशी मागणीही गिरीजा राऊत यांनी केली होती. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी. मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली आहे. 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हटल्यावर तिने तक्रार केली, असा दावा विनायक राऊतांनी केला. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आई-वडील समोर असताना तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.
विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय? (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut)
लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गितेश राऊत हनीमूनसाठी ऊटी येथे गेलो होतो.ऊटी येथे एकूण 6 दिवस राहिलो असता गितेश माझ्या सोबत शारीरिक संबंध न ठेवता माझ्यापासून दूर राहिला होता. त्याबाबत मी त्याला विचारले की तू असा का वागत आहेस, तुझा काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी त्याने मला मेंटल कनेक्ट होणे गरजेचे आहे. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नाहीत, मला हनीमूनचा कंटाळा येतो असे सर्व बोलून मला टाळू लागला. ऊटीवरून मुंबईला आल्यानंतर गावी होणा-या आमच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आम्ही मुळगावी – तळगाव, मालवण येथे जाण्यास निघालो. त्यावेळी आम्ही पालीच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. त्यावेळी गितेश हा गाडीतून उतरून पुढे चालू लागला. मी साडी घातल्याने व अंगावर दागिने असल्याने मला चालण्यास उशीर होऊ लागल्याने त्याने मला सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांसमोर तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाही असे सर्व बोलून गलीच्छ भाषेत अपमानित केले होते. प्रत्येक वेळेस गितेशने कधीही भांडण सुरु केल्यास आजूबाजूचा परिसर, भाषा, वेळ-काळ, माझ्या भावना ह्याचा कसलाही विचार न करता त्याचं मनशांत होईपर्यंत माझ्याशी वाद घातले आहेत, असा धक्कादायक आरोप गिरीजा राऊत यांनी केले आहेत.
संबंधित बातमी:
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Comments are closed.