यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर, गेल्या वर्षी दसऱ्यात सोने दर किती होता ?
दसारा वर सोन्याचे दर: दरवर्षी अश्विन महिन्याच्या दशमी तिथीला विजयादशमी साजरी केली जाते . साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या दिवशी ग्राहक आवर्जून सोनं खरेदी (Gold) करतात . महाराष्ट्रात जळगावच्या (Jalgaon )सुवर्णनगरीत यंदा दसऱ्याच्या दिवशी सोनं एक लाख 21 हजारंवर पोहोचलं आहे . गेल्यावर्षी दसऱ्याच्या दिवशी सोन्याचे दर हे 79 हजार 730 होते . म्हणजे वर्षभरात सोन्याच्या दरात तब्बल 41 हजार 270 रुपयांची वाढ झाली आहे .
अमेरिकेचा टॅरिफ कर, अनेक देशांमध्ये असलेली युद्धजन्य परिस्थिती त्यामुळे जागतिक अनिश्चितता कायम आहे . त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार सोने खरेदी करताना दिसतात . मात्र, यंदा सोनं ग्राहकांच्या बजेट बाहेर गेल्यानं खरेदीवर परिणाम होणार हे निश्चित आहे . मात्र, सोने खरेदीसाठी दसऱ्याचा दिवस चांगला मुहूर्त समजला जात असल्याने अनेक ग्राहक आपापल्या बजेट प्रमाणे सोने खरेदी करत असल्याचं दिसून येत आहे .
जळगावच्या सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची पसंती
सोन्याच्या दरात मोठी वाढ असली तरी सोने खरेदीचा मुहूर्त असल्याने आम्ही सोने खरेदी साठी आलो असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत .जळगाव सुवर्ण नगरी मधे दसऱ्याचा मुहूर्त सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो . मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 41 हजार रुपयांची सोन्याच्या दरात वाढ असल्याने ,ग्राहक सोने खरेदीला कसा प्रतिसाद देतात,याची सुवर्ण व्यावसायिकांना प्रतिक्षा आहे . मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असल्याची अनेक ग्राहकांची श्रद्धा असल्याने,अनेक ग्राहक हे आपल्या ऐपती प्रमाणे सोने खरेदीचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत .
सोने खरेदी ग्राहकांसाठी ठरते अडचणीची
गेलं काही दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत .मागील आठ दिवसात सोन्याच्या किमती दहा ते बारा हजार रुपयांनी वाढले आहेत .जगातील अनेक देशांमध्ये सुरू असलेले युद्ध, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्यासह चांदीच्या किमतीही वाढत आहेत .सणासुदींचा आणि त्यानंतर लग्नसराईचा कालावधी सुरू होत असताना सोन्याच्या दारात झालेली ही वाढ ग्राहकांसाठी काहीशी अडचणीची ठरत आहे .
कोणत्या शहरात आज सोन्याचा दर किती ?
(24 कॅरेट,10gm )
मुंबईअदृषूकपुणे : 1 लाख 17 हजार 410
नवी दिल्ली: 1 लाख 17 हजार 210
कोलकाता: 1 लाख 17 हजार 250
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.