सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताज

सोने चांदीचे दर: गेल्या काही दिवसांपासून भारतातील सोन्या चांदीच्या दारात (Gold Silver Rates) सातत्याने चढउतार दिसून येत आहेत. आठवड्याभरापूर्वी चढे असणारे सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करत असाल तर सराफा बाजारात तुमच्या शहरातल्या किमती आणि ताजे दर जाणून घ्या.आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी,डॉलरचा वाढता दर, रुपयाची घसरण अशा अनेक कारणांमुळे सोन्या-चांदीच्या दरामध्ये देशांतर्गत बाजारातही बदल घडत असतात.

सोन्या चांदीचे दर घसरले

19 जुलै 2026 रोजी सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत किंचित घट नोंदवली गेली आहे. देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर  1 लाख 41 हजार 610 रुपयांवर स्थिरावला आहे.काल हा दर एक लाख 42 हजार 680 रुपये होता. कालच्यापेक्षा आज साधारण 1000 रुपयांची घसरण सोन्याच्या दरात नोंदवली गेली आहे. तर चांदीचा दर किलोमागे 2 लाख 16 हजार 860 रुपयांवर पोहोचला आहे. शनिवारी ( 18 जुलै ) चांदीचा दर 2 लाख 35 हजार रुपये होता. त्यामुळे कालचा तुलनेत चांदीच्या दरात जवळपास 18 हजारांची घसरण झाली आहे.

कोणत्या शहरात किती दर ?

मुंबई, पुणेछत्रपती संभाजीनगर,  नाशिक, नागपूर या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम मागेदर एक लाख 41 हजार 360 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 29 हजार 580 रुपयांवर असून 18 कॅरेटचा दर 1 लाख 06 हजार 20 रुपये झालाय. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 41 हजार 110 रुपये आहे.22 कॅरेट सोनं एक लाख 29 हजार 351 रुपयांवर पोहोचलंय.

सोन्या-चांदीच्या किमती घसरण्याचं कारण काय?

बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती.अमेरिका इराणच्या शांतता कराराच्या मावळत्या आशांमुळे महागाईची चिंता वाढली आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर चढाच  राहण्याच्या अपेक्षांना बळकटी मिळाली.परिणामी सोन्याचांदीच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली.या घसरणीनंतर सोन्या चांदीच्या घसरणीचा हा ट्रेंड कायम आहे.

सोन्या चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम असून महिन्याभरापूर्वी एक लाख 47 हजार 530 रुपयांवर असलेलं सोनं आठवड्याभरापूर्वी  एक लाखाचा 44 हजार रुपये होता. या आठवड्याच्या शेवटी 1 लाख 41 हजार 610 रुपयांवर फादर पोहोचलाय.चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर,महिनाभरापूर्वी दोन लाख 33 हजार 820 रुपयांवर असलेली चांदी आठवड्या भरापूर्वी दोन लाख 23 हजार रुपयांवर पोहोचली.या आठवड्यात दोन लाख 16 हजार 860 रुपयांवर चांदीची किंमत स्थिरावली आहे.

आज सोने-चांदी खरेदी करावी का?

जर तुम्ही लग्नसराई, सण-उत्सव किंवा वैयक्तिक वापरासाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम आपल्या शहरातील ताजे दर तपासणे आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता, दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरचा दर, व्याजदर आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.