विठ्ठलाच्या जयघोषात मुंबई दुमदुमणार; दादरमध्ये भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून दादरमध्ये भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फूल मार्पेट व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिंडी सोहळा आयोजित केला असून यंदाचे सोळावे वर्ष आहे. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता स्वर्गीय मीनाताई ठाकरे फूल मार्पेट येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे.

दिंडीनिमित्त ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. पारंपरिक वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, बँड पथक, विठ्ठलनामाच्या जयघोषात ही दिंडी दादर फूल मार्पेट येथून सुरू होऊन सेनापती बापट मार्ग, दादर फूल मार्पेट परिसर, रेल्वे स्थानक परिसर, कबुतरखाना, एन.सी. केळकर रोड, रानडे रोड मार्गे डी.एल. वैद्य रोडवरील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे या सोहळ्याची सांगता होणार आहे. दिंडी दरम्यान दादर स्टेशनसमोरील कामत हॉटेल परिसरात रिंगण सोहळा पार पडणार आहे. या दिंडी मार्गावर विविध ठिकाणी भाविकांसाठी अल्पोपाहार व प्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे.

भाविकांना आवाहन

सोहळ्यात दादर फूल मार्पेटमधील व्यापारी, फूल विव्रेते, वारकरी तसेच विविध राजकीय पक्ष व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी सहभागी होणार असून भाविकांनी या सोहळ्यात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संत कृष्णदास महाराज सत्संग मुंबई व दादर फूल मार्पेट व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.