दहिसर, विलेपार्ल्यातील बेकायदा बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत उपक्रमांतर्गत दहिसर आणि विलेपार्ल्यामधील फुटपाथवर झालेली शेकडो बेकायदा बांधकामे तोडून टाकली. यामध्ये विलेपार्ल्यातील तब्बल 650 मीटर लांबीचा फुटपाथ फेरीवालामुक्त झाला, तर दहिसरमध्ये केलेल्या कारवाईत 70 मीटर लांबीचा फुटपाथ बेकायदा फेरीवालामुक्त करण्यात आला. मुंबईकरांना फुटपाथवरून सुलभपणे चालता यावे यासाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी आवश्यक मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने पालिकेकडून विविध ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात येत असून दहिसर व विलेपार्ले पूर्व येथील पदपथावरील बेकायदा बांधकामे हटवण्यात आली.
Comments are closed.