गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त; काय आहे संपूर्ण प्रकरण?


रत्नागिरी : हापूस (Mango) म्हटलं की कोकण, कोकण (Kokan) आणि हापूस हे जणू समीकरणच बनलं आहे. पण आता गुजरातमधल्या (गुजरात) वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन मिळावं यासाठी अर्ज करण्यात आला आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांनी याला कडडून विरोध केला आहे. दरम्यान आंब्याला हापूस शब्द का महत्त्वाचा? कोकणातील हापूस ही ओळख कधी मिळाली आणि त्याचा फायदा काय? वलसाड येथील आंब्याला हापूस मानांकन देण्यासाठी विरोधाची कारणे काय? वलसाड येथील आंब्याला हापूस मानांकन मिळाल्यास त्याचा कोकणच्या हापूस वर काय परिणाम होणार? या प्रश्नांची उत्तरं या लेखातून मिळवण्याचा प्रयत्न आहे.

कोकणचा हापूस आंबा खवय्यांसाठी आवडीचं फळ. मार्च महिना लागतात सर्वांना हापूसची ओढ लागते, दरम्यान कोकण म्हणजे हापूस आणि हापूस म्हणजे कोकण ही जगभरात ओळख. पण आता गुजरात राज्यातील वलसाड येथील आंब्याला हापूस मानांकन मिळावं यासाठी अर्ज केला गेल्याने त्याला कोकणातून तीव्र विरोध आहे.

कोकणचा हापूस नावाखाली अद्यापही मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीत फसवणूक होते. बाजारात असलेले विविध भागातील आंबे कोकणातील हापूस म्हणून विकले जातात. यापूर्वी देखील सारखीच परिस्थिती होती, त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. याशिवाय, ग्राहकांची फसवणूक देखील. त्यामुळे भौगोलिक मानांकनासाठी कोकणातून लढा सुरू झाला आहे, असे कोकण हापूस उत्पादक व विक्रेते संघांचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी म्हटलं. कोकणच्या आंब्याला 2018 मध्ये हापूस हे मानांकन मिळालं. त्यामुळे कोकणातील हापूसला वेगळी ओळख प्राप्त झाली. कोकण किनारपट्टी भागात असलेल्या वातावरणामुळे या आंब्याला विशिष्ट अशी चव आहे. त्यामुळे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील आणि जगभरातील बाजारात त्याला मोठी मागणी आहे. कोकणातील हापूस नंतर 2022 मध्ये नारायणगाव आणि त्यानंतर 2023 मध्ये वलसाड येथील आंब्याला हापूस मानांकनासाठी अर्ज केला गेला आहे. याबाबतची सुनावणी सुरू झाल्यानंतर त्याला तीव्र विरोध कोकणातून झालायअशी माहिती विवेक भिडे यांनी दिली.

न्यायालयीन लढाई लढू

जगाच्या पाठीवर आज कोकणातील हापूसची ओळख आहे. परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत असलेला हापूस आणि त्यातून निर्माण होणारी आर्थिक उलाढाल देखील मोठी आहे. दरम्यान, हापूस ही कोकणची ओळख आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया मी पूर्ण केलेल्या आहेत. सर्व बाबी सिद्ध केलेल्या आहेत. त्यामुळे हापूस मानांकन इतर कोणालाही मिळाल्यास त्याबाबत आम्ही भविष्यात आणखीन न्यायालयीन लढाई लढू, असं कोकणातल्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विवेक भिडे यांनीही आपली भूमिका परखडपणे मांडली.

कोकणातील हापूस आंब्याचं एकूण क्षेत्र

रत्नागिरी जिल्हा 1 लाख 13 हजार हेक्टर.

सिंधुदुर्ग जिल्हा: 33 हजार 475 हेक्टर.

रायगड जिल्हा: 14 हजार 500 हेक्टर.

घेतले जाणारे उत्पन्न – 2. 50 लाख मेट्रिक टन

आर्थिक उलाढाल ( आकडे ) – जवळपास 300 कोटी

परकीय चलन – 300 ते 320 कोटी

निर्यात होणारा हापूस – 25 हजार मेट्रिक टन

हेही वाचा

उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

आणखी वाचा

Comments are closed.