हे सरकार लुटारु, देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच, सपकाळांची टीका

हर्षवर्धन सपकाळ: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनाला उद्यापासून सुरु होत आहे. प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न असतो. लोकशाहीला तिलांजली फासण्याचे काम सत्ताधारी करत असतात. अत्यंत टपोरीपनासारखे काम सुरु असते, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार लुटारु आहे. त्यामुळं सरकारने श्वेतपत्रिका काढावी असेही सपकाळ म्हणाले. राम शास्त्री प्रभुणे यांचे पुणे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने तालिबान केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

पुणे मुंबई जमीन घोटाळे त्याचा मलिदा किती लाटला हे ही मागितले आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण गुजरात कनेक्शन समोर येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरवणीवर आल्याची टीका सपकाळ यांनी केली. काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये आहे. महापालिका निवडणुकीत आम्हाला हवं तसे यश मिळाले नाही, आम्ही पुणेकरांसाठी लढू, गप्प बसणार नाही असा इशारा सपकाळ यांनी दिला. वाहतूक पाणी स्वच्छता सर्व प्रश्नावर आम्ही आवाज उठवला. अमेरिकन बिल आले आहे, त्यामुळं सोयाबीनसह कापसाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी याचा फटका बसला आहे. पदयात्रा राज्यात काढणार आहोत, हिंगोली यवतमाळ या ठिकाणी रॅली करणार असल्याचे सपकाळ म्हणाले.

एपस्टीन फाईलमुळे अनेक मुद्दे पुढे

एपस्टीन फाईलमुळे अनेक मुद्दे पुढे आले आहेत. नैतिकता आणि धर्म आपल्यासाठी सगळे समोर आले आहे. नरेंद्र मोदी सरकारने एपस्टीन फाईल बाबत काही बोलत नाहीत, मोदी यावर काही बोलत नाहीत. नरवणे यांनी त्याच्या पुस्तकाचा खुलासा केला जात नाही, पुण्याशी त्याचे संबंध आहेत, महाराष्ट्र आणि देशांत काय चालले आहे .

आम्ही ड्रग्स प्रकरणात यापुढे कडक भूमिका घेऊ

आमचा पक्ष संविधान पद्धतीने पुढे जाणार पक्ष आहे. हिंसा आम्ही मानत नाही, अंगावर आले तर शिंगावर करण्याची भाषा करु नये, लोकशाहीमध्ये आंदोलन करणे ठीक आहे पण चर्चा झाली पाहिजे असे मत सपकाळ यांनी व्यक्त केले. राम शास्त्री प्रभुणे यांचे पुणे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने तालिबान केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती एकच आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. पोलिसांनी सदरक्षणाय च काम करावे. आम्ही ड्रग्स प्रकरणात यापुढे कडक भूमिका घेऊ. महाविकास आघाडी राहो ही आमची भूमिका आहे, आज राष्ट्रवादी गैरहजर का राहील याची माहिती नाही असे सपकाळ म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.