धर्मादाय आयुक्तांचा आदेश कायम, जुन्या मतदारयादीनुसार ‘एशियाटिक’ची निवडणूक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणूक प्रक्रियेला आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या मतदारयादीनुसार मतदान होईल असे स्पष्ट करत न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली तसेच धर्मदाय आयुक्तांनी दिलेला आदेश हायकोर्टाने कायम ठेवला.

दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिली असून धर्मादाय आयुक्तांच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. अध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार केतकर, विश्वस्त विश्वास उटगी, धनंजय शिंदे व स्वाती दाते यांनी या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायमूर्ती फरहान दुभाष यांनी राखून ठेवलेला निकाल आज गुरुवारी जाहीर केला. त्या वेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांची मागणी फेटाळून लावली.

न्यायालयाचे निरीक्षण

धर्मादाय आयुक्तांच्या निरीक्षकाने सादर केलेल्या अहवालानुसार संस्थेच्या संग्रहातून सुमारे 2050 पुस्तके बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी घेतलेले निर्णय, विशेषतः नवीन सदस्यांची नोंदणी, हे कायदेशीरदृष्टय़ा चुकीचे होते.

कार्यकाळ संपल्यानंतरही सुमारे 1467 अर्जांची शिफारस करण्यात आली ज्यातील बहुतेकांना व्यवस्थापन समितीची रीतसर मंजुरी नव्हती.

Comments are closed.