मला अटक करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन; भास्कर जाधवांनी सांगितलं राज’कारण’

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुंबईतील (Mumbai) मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांसह महायुतीमधील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरील आरोपावर बोलताना, खेडमध्ये बारबाला नाचवून मोठे खड्डे पडलेत, अशी टीका भास्कर जाधव (भास्कर जाधव) यांनी नाव न घेता रामदास कदमांवर केली. तसेच, मंत्री आणि संत्री कोण ? अधिकारी मला कापतात. मी यांचा बाप आहे, असे म्हणत जाधव यांनी आपण कुणालाही भीत नसल्याचे म्हटले. तसेच, मला अटक करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून गृहमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फडनाविस) यांनी रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना फोन करत दबाव टाकला होता, असा गौप्यस्फोटही भास्कर जाधव यांनी केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुहागर विधानसभा मतदारसंघ, मुंबईवासी सहकाऱ्यांचा संवाद मेळावा दादर येथील शिवसेना भवनमध्ये संपन्न झाला. येथील मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघ आणि स्थानिक राजकारणावरुन जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, थेट ब्राह्मण विरुद्ध ओबीसी असे वादग्रस्त भाषण करत जाधव यांनी स्थानिक नेत्यांना इशाराही दिला आहे. गेल्या काही दिवसांत मतदारसंघातील खोतकी विषयावरुन भास्कर जाधव आणि ब्राह्मण महासंघ यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. त्यावरुन, आजच्या भाषणात भास्कर जाधव यांनी सवाल केला.  मी लिहिलेल्या पत्रात खोट काय? खोतकीबाबत केलेल्या विधानावर आपण ठाम असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.

तुम्ही इतर समाजावर काहीही बोलायचं आणि आम्ही बोललो की असे पत्रव्यवहार करत जातीचा रंग द्यायचा. येणारा काळ सर्वांसाठी अडचणीचा आहे, असे म्हणत मुंबईतील सभेत विनय नातू यांची भास्कर जाधवांनी टिंगल केली. सन 2019 मध्ये भाजप शिवसेना युती असताना भाजपने राष्ट्रवादीला मदत केली. यावेळी भाजपाने राजेश बेंडल यांना मदत केली. त्यांना अडचण बहुजन समाजाचा असलेल्या भास्कर जाधव यांची आहे, असे म्हणत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, समाजाचा नेतृत्व संपवण्यासाठी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम यांनी केलं. समाजात तेढ निर्माण करणारे हेच अनाजीपंत असल्याचं जाधव यांनी म्हटलं. मी 20 गावाहून जास्त गावचा दस्त भरणारा मी खोत आहे. सावध व्हा हा शेवटचा वार आहे, भास्कर जाधव सहज हटणार नाही. एका पत्रावर मला लिहतात, माझा निषेध करतात मग आपला मराठा समाज मेला का? असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना सोडणार नाही

लढाई कितीही मोठी होऊद्या, माजी राजकीय कारकीर्द संपली तरीही चालेल पण माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना मी सोडणार नाही, असा थेट इशाराही जाधव यांनी दिला. तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीत अंगावर केसेस घेणारा भास्कर जाधव आहे. मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकलं म्हणून समजा. पूजा कोण सांगायला आला नाही तर मी येईन घाबरू नका. समोरासमोर ते माझ्याशी दोन हात करू शकत नाहीत, म्हणून बदनाम करून खच्ची करण्याचे काम सुरू आहे. हे लोक स्वतःच्या घरात पूजा घालतात का ते विचारा, त्यांना अडचण बहुजन समाजाचा असलेल्या भास्कर जाधव यांची आहे. माझ्या आईला शिव्या दिल्या तेव्हा विनय नातू टाळ्या वाजवत होते. मला घरी पाठवलं तरी चालेल मी समाधानाने घरी जाईन, अशी भावनिक सादही भास्कर जाधव यांनी कुणबी समाजाला घातली.

मला अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांचा फोन

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय मी केली, 30 टक्के अधिक शुल्क कमी करायला लावलं. कुटुंबप्रमुख म्हणून मला माझी जबाबदारी कळते, एवढ करुन माझी संकासुर म्हणून टिंगल टवाळी होतेय. पण, ते सगळ विसरून मी काम करतोय. खेडमध्ये बारबाला नाचवून मोठे खड्डे पडले आहेत, असे म्हणत भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर टीका केली. तसेच, मंत्री आणि संत्री कोण? अधिकारी मला कापतात, मी यांचा बाप आहे. मला अटक करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना फोन करत दबाव टाकला होता, असा गौप्यस्फोटही भास्कर जाधव यांनी केला. निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी बौद्ध समाजाला माझ्या विरोधात भडकावले. वंचित बहुजन आघाडीचे अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला, त्यात माझं नाव घेण्यात आलं. ठाण्यातील त्या राजकीय नेत्याला देखील मी सोडणार नाही, असे म्हणत भास्कर जाधव यांनी थेट इशारा दिला.

हेही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.