टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर हरमनप्रीतच्या कर्णधारपदावर टांगती तलवार? प्रशिक्षक मजूमदार काय म्हणाले

आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 women’s World Cup 2026) मध्ये टीम इंडियाला (Team india out of the tournament) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ग्रुप स्टेज सामन्यात 6 विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. या कामगिरीनंतर आता हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur captaincy) कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या निराशाजनक कामगिरीनंतर हरमनप्रीत कौरकडून कर्णधारपद काढून घेतले जाईल का, असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय महिला संघाचे हेड कोच अमोल मजूमदार (Amol Majumdar) यांनाही यावर प्रश्न विचारण्यात आला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कोच अमोल मजूमदार यांनी हरमनप्रीत कौरचे समर्थन केले. ते म्हणाले की, मला वाटते की तिने सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत राहावे.मात्र, अंतिम निर्णय निवड समितीचा (सिलेक्टर्स) असेल, हे ही त्यांनी स्पष्ट केले. मजूमदार म्हणाले, कोण कर्णधार असेल हे ठरवणे सिलेक्टर्सचे काम आहे. पण जर तुम्हाला माझे स्पष्ट मत हवे असेल, तर हो, मी तिलाच कर्णधार म्हणून पाहू इच्छितो.

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये हरमनप्रीत कौरची वैयक्तिक कामगिरी संमिश्र राहिली. या वर्ल्ड कपमध्ये तिला 5 सामन्यांत फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये तिने 141 धावा केल्या. तिचा सरासरी 35.25 चा होता आणि तिने 131.77 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या. या स्पर्धेत तिने एक अर्धशतक झळकावले. 56 धावा ही तिची सर्वोच्च धावसंख्या होती, जी तिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात केली होती.

या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ ‘ग्रुप ए’ मध्ये होता. टीम इंडियाने आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्यांना 64 धावांनी विजय मिळाला. त्यानंतर भारताने नेदरलँड्सविरुद्धचा सामना 95 धावांनी जिंकला. टीम इंडियाला या वर्ल्ड कपमधील पहिला पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पत्करावा लागला, तर बांगलादेशला भारताने 5 विकेट्सनी हरवले. पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघ 5 सामन्यांत 3 विजयांसह 6 गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिला.

Comments are closed.