IND W vs SA W – दक्षिण आफ्रिकेची हिंदुस्थानवर विजयी सलामी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण आफ्रिका महिला संघाने हिंदुस्थानचा सलामीच्या टी-२० क्रिकेट सामन्यात पराभव केला. हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करत १५८ धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना कर्णधार लॉरा वोल्वार्ट हिच्या ५१ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य ६ विकेट्स आणि ५ चेंडू शिल्लक ठेवून सहज गाठले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानची स्मृती मानधना (१३) लवकर बाद झाली. शेफाली वर्मा (३४) व जेमिमा रॉड्रिग्ज (३६) यांनी चांगली फलंदाजी केली. जेमिमाने कर्णधार हरमनप्रीत कौर (४७) हिच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. १५ षटकांनंतर हिंदुस्थानची धावसंख्या २ बाद ११९ अशी होती. मात्र अखेरच्या ५ षटकांत हिंदुस्थानने केवळ ३३ धावा करत ४ विकेट्स गमावल्या. त्यामुळे संघाला १६० धावांपर्यंतही मजल मारता आली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाका हिने ३, तर तुमी सेखुखुने हिने २ फलंदाज बाद केल्या.

वोल्वार्टची अर्धशतकी खेळी

हिंदुस्थानकडून १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार लॉरा वोल्वार्टने ३९ चेंडूंत ५१ धावांची खेळी साकारली. वोल्वार्टने एनरी डेर्कसेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. डेर्कसेनने ३४ चेंडूंत नाबाद ४४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. क्लो ट्रायोनने विजयी षटकार ठोकला. हिंदुस्थानने १४ चेंडू वाईड टाकले. हिंदस्थानकडून श्रेयंका पाटीलने २, तर अरुंधती रेड्डी व श्री चरणी यांनी १-१ बळी टिपला.

Comments are closed.