नेपाळचा 26 धावांत फडशा; हिंदुस्थानचा त्रिशतकी विजय
एशिया कप रायझिंग स्टार्स क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानच्या अ संघाने तिलक वर्मा (107) आणि कुमार कुशाग्र (117) यांच्या शतकांच्या जोरावर 9 बाद 332 धावांचा डोंगर रचल्यानंतर हर्षित राणा आणि प्रिन्स यादव यांच्या भेदक माऱ्याने नेपाळचा अवघ्या 26 धावांत फडशा पाडला आणि एकदिवसीय क्रिकेटचा इतिहासातील त्रिशतकी विजयाची नेंद केली. या स्पर्धेत एकंदर आठ संघ सहभागी झाले असून हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे ‘अ’ संघ खेळत आहेत. तसेच हाँगकाँग, नेपाळ आणि युएईच्या संघांचाही समावेश आहे. आजच्या लढतीत हिंदुस्थानी ‘अ’ संघाचा कर्णधार तिलक वर्माने 3 बाद 42 अशा बिकट अवस्थेनंतर कुमार कुशाग्रसह 206 धावांची संयमी भागी रचली. 36 षटकांत 3 बाद 164 धावा करणाऱ्या हिंदुस्थानने शेवटच्या 14 षटकांत 168 धावा चोपून काढत 332 अशी मजल मारली. गोलंदाजीत प्रिन्स यादवने 6 धावांत 5 विकेट टिपले तर हर्षित राणाने 16 धावांत 4 विकेट घेत नेपाळचा 11.3 षटकांत 26 धावांत खुर्दा पाडला.
Comments are closed.