राष्ट्रीय गोल्फ स्पर्धा मुंबईत
इंडियन गोल्फ युनियनने 125 व्या अखिल हिंदुस्थानी हौशी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेसाठी रोख पारितोषिक जाहीर केले. विजेत्याला 75 हजार रुपये, तर उपविजेत्याला 50 हजार रुपये मिळणार आहेत. बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबमध्ये 7 ते 13 डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. 1892 पासून सुरू असलेली ही जगातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या हौशी मॅच-प्ले स्पर्धांपैकी एक आहे.
Comments are closed.