IPL 2026 – लुंगी एनगिडी मैदानातच कोसळला! डोक्याला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी गंभीर दुखापत झाली आहे. डावातील तिसऱ्या षटकात पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्य याचा झेल घेण्याच्या प्रयत्नात धावत असताना एनगिडीचा तोल गेला आणि त्याचे डोके जमिनीवर जोरात आदळले. या धक्क्यामुळे एनगिडीला मैदानावर कोणतीही हालचाल करता येत नव्हती, ज्यामुळे सामन्यातील खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
लुंगी Ngidi साठी प्रार्थना. तो मैदानावर गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे. आशा आहे की हे काही गंभीर नाही. pic.twitter.com/vK4XrJTnlk
— सनरायझर्स फॅन (@teiangana) 25 एप्रिल 2026
घटनेचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय पथकाने तातडीने मैदानात धाव घेतली. प्राथमिक तपासणीनंतर त्याला स्ट्रेचरवर न नेता थेट रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुर्घटनेमुळे बराच वेळ खेळ थांबवण्यात आला होता. सध्या दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
Comments are closed.