IPL 2026 – गुजरातने चेन्नईला संपवले, सिराजच्या माऱ्यामुळे टायटन्सचा 89 धावांनी विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

साई सुदर्शन, शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या खणखणीत अर्धशतकांच्या जोरावर गुजरात टायटन्सने उभारलेल्या 230 धावांचे आव्हान चेन्नई सुपर पिंग्जला पेलवले नाही आणि गुजरातच्या गोलंदाजांनी चेन्नईचा डाव 140 धावांतच संपवत त्यांचा आयपीएलमधला खेळ साखळीतच संपवला. तसेच गुजरातने आपल्या नवव्या विजयाची नोंद करत 18 गुणांसह तालिकेत दुसरे स्थान कायम राखले.

चेन्नईला आपले प्ले ऑफचे आव्हान जिवंत राखण्यासाठी विजयाची गरज होती, पण त्यांच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्यामुळे गुजरातने  पॉवर प्लेमध्येच आपला विजय पक्का केला.  मोहम्मद सिराज आणि पॅगिसो रबाडा यांनी 7 षटकांत 5 बाद 63 अशी दुर्दशा केली आणि सामन्यावर पकड मिळवली. तळाला शिवम दुबेच्या (47) झंझावातामुळे चेन्नईला 140 पर्यंत पोहोचता आले. सिराज आणि रबाडाने प्रत्येकी 3-3 विकेट टिपले.

गुजरातला मोठा विजय मिळवून देण्याचा पाया कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने रचला. गिलने झंझावाती अर्धशतक ठोकं@ैप’ पुन्हा आपल्याकडे घेत आपली धावसंख्या 616 वर नेली. गिलची खेळी  64 वर संपली. त्यानंतर सुदर्शननेही चेन्नईच्या गोलंदाजीची पिसे काढत गिलची ‘ऑरेंज कॅप’ स्वतःच्या डोक्यावर ठेवली. साईला आपल्या दुसऱ्या शतकाची संधी होती, पण त्याची खेळी 84 धावांवर थांबली. याआधी साई आणि शुभमनने 125 धावांची सलामी देताना दहावी शतकी भागी साकारली आणि विराट कोहली-ख्रिस गेल जोडीचा दहा शतकी भागींच्या विक्रमाची बरोबरी साधली. गिलबरोबरच्या शतकी भागीनंतर साईने जोस बटलरच्या साथीने 82 धावांची भागी रचली. बटलरने 27 चेंडूंत 57 धावांचा सुस्साट खेळ केला. त्याच्या फटकेबाजीमुळेच गुजरातला 4 बाद 229 असा जबरदस्त स्कोअर उभारता आला.

Comments are closed.