IPL 2026 – केकेआरच्या विजयानंतर मोठा विक्रम
केकेआरने महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर दमदार विजय साकारला आणि प्ले ऑफमध्ये आपले आव्हान कायम ठेवले आहे. पण या केकेआरच्या विजयानंतर आयपीएलमध्ये एक मोठा विक्रम रचला गेला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये अशी गोष्ट कधीच घडली नव्हती. केकेआरच्या विजयानंतर सर्वाधिक वेळा आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम घडला आहे.
जेव्हा कोलकाताने मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्स राखून विजय मिळवला. एकाच आयपीएल हंगामातील धावांचा पाठलाग करताना हा सर्वाधिक वेळा मिळवलेला विजय आहे. 2016 च्या आयपीएल हंगामात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 41 सामने जिंकले होते. या हंगामात धावांचा पाठलाग करताना 42 वेळा विजय मिळवण्यात आला आहे.
आयपीएलच्या या पर्वात आतापर्यंत झालेल्या 65 सामन्यांपैकी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 42 वेळा विजय मिळवला आहे. म्हणजेच पूर्ण झालेल्या सामन्यांपैकी 64.6 टक्के सामने दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. आतापर्यंत फक्त तीन आयपीएल हंगामांमध्ये (2026, 2016 आणि 2011) लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 40 किंवा त्याहून अधिक विजय मिळवले आहेत. या वर्षी दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांच्या बाजूने झुकलेला कल स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जो टॉस जिंकेल तो प्रथम गोलंदाजी करायला प्राधान्य देईल, असे म्हटले जात आहे.
Comments are closed.