IPL 2026 – धोनीच्या नावावर चाहत्यांची फसवणूक, धोका देण बंद करा; माजी क्रिकेटपटूचा CSK मॅनेजमेंटवर घणाघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 च्या संपूर्ण हंगामात कर्णधार ऋतुराज गायकवाड, प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि फ्रेंचाइजी मॅनेजमेंटने एमएस धोनीच्या पुनरागमनाबाबत चाहत्यांना अंधारात ठेवले आणि त्यांची फसवणूक केली, असा थेट आरोप हिंदुस्थानचे दिग्गज क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी केला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘#MSDhoniScam’ हा ट्रेंड जोरदार चर्चेत असून, चेन्नईने केवळ प्रसिद्धी आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी धोनीच्या नावाचा गैरवापर केल्याचा सूर उमटत आहे.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना के. एस. श्रीकांत यांनी चेन्नईच्या रणनीतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीला दुखापत असल्याचे सांगून तो लवकरच परतेल अशी आशा दाखवण्यात आली. ऋतुराज गायकवाड आणि प्रशिक्षक फ्लेमिंग प्रत्येक वेळी धोनी पुढील सामन्यात खेळू शकतो, असेच सांगत राहिले. प्रत्येक सामन्यापूर्वी धोनीच्या सरावाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मुद्दाम पोस्ट केले जायचे, जेणेकरून चाहत्यांना तो फिट असल्याचे वाटावे. जर धोनी संपूर्ण हंगाम खेळणार नव्हता, तर मॅनेजमेंटने हे आधीच स्पष्ट करायला हवे होते, जेणेकरून चाहत्यांची निराशा झाली नसती.” असं श्रीकांता म्हणाले.

IPL 2026 मध्ये नाही पण पुढच्या हंगामात महेंद्र सिंग धोनी मैदानात उतरणार? ऋतुराज गायकवाडने दिले थेट उत्तर

गुरुवारी गुजरात टायटन्सविरुद्ध पराभूत झाल्यानंतर चेन्नईचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यानंतर जेव्हा ऋतुराज गायकवाडला धोनीच्या आयपीएल 2027 मधील सहभागाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने “ते पुढच्या वर्षीच समजेल,” असे मोघम उत्तर दिले. गायकवाडच्या या उत्तरावर श्रीकांत कमालीचे भडकले. त्यांनी चेन्नई व्यवस्थापनाला सुनावताना सांगितले की, “आता तरी चाहत्यांची दिशाभूल करणे आणि त्यांना धोका देणे बंद करा.” धोनी खेळणार नसतानाही केवळ हायप (Hype) तयार ठेवण्याच्या CSK च्या या भूमिकेवर आता क्रिकेट जगतातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Comments are closed.