IPL 2026 – 2 कोटीला खरेदी केलं आणि संपूर्ण स्पर्धेत बसवून ठेवलं, मायदेशी परतताच त्याने ठोकलं खणखणीत शतक
IPL 2026 मध्ये RCB ने क्वालिफायर-1 मध्ये गुजरातचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दुसरीकडे एलीमीनेटर सामन्यात राजस्थाने हैदराबादला पराभवाची धुळ चारत स्पर्धेतून बाहेर काढलं. एलिमीनेटर आणि प्लेऑफच्या या धामधुमीत कोलकाता नाईट राडयर्सच्या फलंदाजाने मायदेशी परतताच दमदार शतक ठोकलं आहे.
आयपीएलमध्ये संपूर्ण सीजन बेंचवर बसून राहावे लागलेल्या न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच आयर्लंडविरुद्धच्या टेस्ट सामन्यात शानदार शतक ठोकले आहे. चालू वर्षीच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला 2 कोटी रुपयांना खरेदी केले होते, मात्र एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नव्हती. आयर्लंडविरुद्ध पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचे टॉम लॅथम (0), डेव्हॉन कॉन्वे (4) आणि केन विल्यमसन (36) स्वस्तात बाद झाल्यानंतर रचिनने डाव सावरला. त्याने 194 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 121 धावांची वादळी खेळी केली.
रचिन रवींद्र व्यतिरिक्त न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज टॉम ब्लंडेलनेही जबरदस्त शतक झळकावले. ब्लंडेलने 233 चेंडूत 18 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 142 धावांची खेळी केली. रचिन आणि ब्लंडेलच्या या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 5 विकेट्स गमावून 361 धावांचा मोठी धावसंख्या उभारली असून सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.
Comments are closed.