IPL 2026 – बेचिराख मुंबईसमोर पंजाबच्या मुंबईकरांचे आव्हान; विजयाच्या वाटेवर परतण्याची श्रेयस अय्यरच्या संघाला संधी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई इंडियन्सचा संघ बेचिराख झाला आहे, त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. पण आता मुंबईचा पुढचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. मुंबईपुढे यावेळी पंजाबच्या संघातील मुंबईच्या खेळाडूंचेच मोठे आव्हान असेल. कारण पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि सुयांश शेडगे चांगल्या फॉर्मात आहे आणि त्यामुळेच मुंबईच्या संघासाठी ते डोकेदुखी ठरू शकतात. पण खरंतर मुंबई आणि पंजाब हे दोन्ही संघ पराभवाच्या गर्तेत अडकलेले आहेत. कारण पंजाबला गेल्या चार सामन्यांत पराभवच पत्करावे लागले आहेत आणि एकही विजय मिळवता आलेला नाही. पण दोन्ही संघांतील एक मोठा फरक म्हणजे मुंबई लीगबाहेर गेली असून पंजाबला प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. पंजाबचे आतापर्यंत 11 सामने झाले आहेत, ज्यामधून सहा लढती ते जिंकले आहेत, तर चार पराभव त्यांना पत्करावे लागले आहेत. एका सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता. त्यामुळे त्यांच्या खात्यात 13 गुण आहेत. पंजाबने जर हा सामना जिंकला तर त्यांचे 15 गुण होतील आणि प्ले ऑफमधील आपले स्थान ते निश्चित करू शकतील.  हा सामना पंजाबने जिंकला. तर त्यांचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित होऊ शकते. त्यामुळे ही लढत महत्त्वाची असेल.

मुंबईच्या कर्णधारपदाचा अजूनही घोळ सुरूच

मुंबईचे आव्हान तर संपुष्टात आले आहे. पण त्यांच्या कर्णधारपदाचा घोळ मात्र अजूनही सुरूच आहे. हार्दिक या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका संघाने घेतलेली नाही. हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादव सपशेल अपयशी ठरला आहे. रोहित शर्मा आणि तिलक वर्माकडून संघाला मोठय़ा आशा असतील. रायन रिक्लेटन हा एकमेव फलंदाज सातत्याने धावा करत आहे. गोलंदाजीत मात्र मुंबईचा संघ आपली छाप पाडू शकलेला नाही.

पराभवाचा दुष्काळ संपविण्यासाठी पंजाब सज्ज

चार सामन्यांत एकही विजय न मिळवण्याची नामुष्की पंजाबवर आली आहे. पंजाबची फलंदाजी चांगली होत असली तरी गोलंदाजीत मात्र त्यांची चमक दिसत नाही. श्रेयस अय्यरने गेल्या लढतीत अर्धशतक झळकावले होते आणि तो चांगल्या फॉर्मात आला आहे. मुंबईकर सुयांश सातत्याने धावा करत आहे. प्रियांश आर्या संघाला दमदार सुरुवात करून देत आहे. गोलंदाजीत मार्कस स्टॉयनिस हा संघासाठी पांढरा हत्ती ठरत आहे. अर्शदीप सिंगचा अपवाद वगळता पंजाबचा एकही गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत नाही.

Comments are closed.