जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगाव : जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपासजवळ (Jalgaon) कोळशाने भरलेला ट्रोला, ‘जळगाव-शिरपूर’ एसटी बस आणि आयशर टेम्पो या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातात (Accident) आयशर चालक गंभीर जखमी झाला असून एसटी बस चालक, महिला वाहक (कंडक्टर) तसेच अन्य चार ते पाच प्रवासी देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघातानंतर कोळसा ट्रॉली चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली, सुदैवाने बसमधील प्रवाशांचा जीव वाचला. मात्र, अपघातामुळे 2 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने रस्ता बराचवेळ जाम झाला होता.
जळगावकडून धरणगावच्या दिशेने जाणाऱ्या कोळशाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोशी एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघाताची तीव्रता लक्षात येताच ट्रॉली चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला उतरविल्याने एसटी बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघातानंतर दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. मात्र, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केल्याचं दिसून आलं.
उल्हासनगर कॅम्प-3 मध्ये झाड कोसळलं
उल्हासनगर कॅम्प-3 परिसरातील फॉलोवर लेन चौकातील जवाहर हॉटेलजवळ अचानक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. झाड रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली. तसेच, झाड वीज वाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, झाड हटविण्याचे आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान झाड कोसळण्याचे दृश्य नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलं आहे.
हेही वाचा
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Comments are closed.