Jalna Accident – जालना-वडीगोद्री मार्गावर शहापूरच्या गल्हाटी नदीवरील पुलावर दोन ST बसचा भीषण अपघात; दोन्ही चालक आणि विद्यार्थी जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जालना-वडीगोद्री मार्गावर शहापूरजवळ गल्हाटी नदीवरील पुलावर अंबड आगाराच्या दोन एसटी बसचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी ९. १५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात दोन बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात भांबेरी ते अंबड जाणारी मानव विकास बस क्र.(एम.एच.१४ बी.टी. १७५०) चालक सारंग ढोले व अंबड ते जालना जाणारी बस (एम.एच.१४ बी.टी. ३०२२) या दोन्ही बसचे चालक संजय ठोसर हे गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच बसमधील शाळकरी विद्यार्थ्यांसह साधारण २५ ते ३० प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती एस.टी.महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. सुदैवाने हा अपघात पुलाच्या मागे अथवा पुढे झाला असता तर खुप मोठी जीवित हाणी झाली असती. मानव विकार मिशन’ची निळी बस क्र.(एम.एच.१४ बी.टी. १७५०) चालक सारंग ढोले व वाहक सुनील भसमारे हे शाळकरी विद्यार्थ्यांना भांबेरी येथून घेऊन अंबडच्या दिशेने जात होते. याच दरम्यान शहापूर परिसरात समोरून येणाऱ्या अंबड आगाराच्याच (एम.एच.१४ बी.टी. ३०२२) या बसची जोरदार धडक झाली. या बसचे संजय ठोसर व वाहक भारती शंकर हे होते. मानव विकासच्या बसमध्ये जवळपास २५ ते ३० विद्यार्थी होते, तर दुसऱ्या बसमध्ये १२ ते १५ प्रवासी प्रवास करत होते. या धडकेत दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले आहे

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना तातडीने अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार सुरू असून गंभीर जखमींवर विशेष लक्ष दिले जात आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

प्राथमिक माहितीनुसार, (एम.एच.१४ बी.टी. १७५०) क्रमांकाची ‘मानव विकास मिशन’ची एसटी बस भांबेरी येथून शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे येत होती. तर दुसरी (एम.एच.१४ बी.टी. ३०२२) क्रमांकाची एसटी बस अंबडहून बीडकडे निघाली होती. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर या दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही बस चालकांसह काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, या भीषण अपघातामुळे जालना-वडीगोद्री महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments are closed.