प्रेमविवाहानंतर बारामतीहून पुण्यात स्थायिक झाले, पतीचं ऑफिसमधील मुलीवर प्रेम जडलं अन्…; विवाह

गुन्हे बातम्या ठेवा: प्रेमविवाह (Love Marriage) करून संसार सुरू केलेल्या एका 25 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास (Hanging) घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime News) घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मृत तरुणीच्या पतीला अटक (Arrested) केली असून, त्याची प्रेयसी आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय 25) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती रोहित मच्छिंद्र घोडे आणि त्याची प्रेयसी तृप्ती वाकचौरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वृषालीची आई लक्ष्मी आरडे (रा. इंदापूर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात (Phursungi Police Station) या संदर्भात  तक्रार दिली आहे.

पुणे क्राईम न्यूज : बारामती टे पुणे… आणि संसाराला लागलं ग्रहण

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली आणि रोहित यांनी सप्टेंबर 2021 मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ बारामती (Baramati) येथे राहिल्यानंतर ते दोघेही नोकरी आणि उदरनिर्वाहासाठी पुण्यात शिफ्ट झाले. मागील दोन वर्षांपासून ते उरुळी देवाची येथील ‘वैष्णव सिटी’ परिसरात भाड्याने राहत होते. रोहित हा’डी-मार्ट’मध्ये (D-Mart) नोकरी करत होता.

Pune Crime News: ऑफिसमधील प्रेमसंबंध आणि वाद

रोहित डी-मार्टमध्ये कामाला असताना तिथेच काम करणाऱ्या तृप्ती वाकचौरे नावाच्या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. पतीच्या या विवाहबाह्य संबंधांची माहिती जेव्हा पत्नी वृषालीला मिळाली, तेव्हापासून त्यांच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला. या कारणावरून गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. पतीच्या सततच्या त्रासाला आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर 27 जून रोजी वृषालीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.

Pune Crime News: पोलिसांकडून तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना मृत वृषालीच्या मोबाईल फोनमध्ये तिने लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीमध्ये तिने आपल्या मृत्यूला पती रोहित आणि त्याची प्रेयसी कशी जबाबदार आहेत, याचा उल्लेख केल्याचे समजते. पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला असून, चिठ्ठीच्या आधारे पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: चेतन-सियाने डिलीट केलेले ‘ते’ चॅट्स रिकव्हर, चॅटिंगसाठी कोड लँग्वेज अन् निकनेमचा वापर; केतन अग्रवाल प्रकरणात चक्रावणारी माहिती

Comments are closed.