दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला, गोळीबारात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, तर इतर 5 जखमी

जम्मू काश्मीर पहलगम दहशतवादी हल्ला मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील  (Pahalgam Terror Attack) मृतांचा आकडा वाढला असून यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात पुण्यातील दिलीप डिसले आणि ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू झालीची समोर आले आहे. यामध्ये डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अशातच पुण्यातील दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून राज्यातील पर्यटकांच्या मृतांचा आकडा आता 6 वर गेला आहे. परिणामी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृतांचा आकडा वाढला असून आता पर्यंत 26 निष्पाप लोकांच्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पूलावामा हल्ल्यानंतर या सर्वात मोठा हल्ला, 6 जण मृत्यूमुखी तर इतर 5 जखमी

आतापर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील अधिक पर्यटक हे महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील असल्याचे बोलले जात आहे.  तर या हल्यात नविन पनवेल मधील दिलीप दिसले यांचा देखील मृत्यू झल्याची माहिती समोर आली आहे. तर सुबोध पाटील हे जखमी झाले आहे. दिलीप दिसले हे निसर्ग पर्यटन कंपनीकडून कश्मिर येथे गेले होते. यात पनवेल, उरण आणि ठाणे येथील 39 पर्यटकांचा समावेश होता.तर यातील सर्वाधिक पनवेलमधील पर्यटक असल्याची माहिती आहे. तर जखमी मधील सुबोध पाटील यांच्यावर कश्मिर येथे उपचार सुरू आहेत. मात्र काश्मीर खोऱ्यात पूलावामा हल्ल्यानंतर या सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात असताना मृतांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता बाळावली आहे.

पर्यटकांसाठी एअर इंडियाकडून अतिरिक्त विमानांची घोषणा

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर घरी परतणाऱ्या पर्यटकांसाठी एअर इंडियाकडून श्रीनगरहून परतण्यासाठी अतिरिक्त विमानांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात सकाळी 11.30 येथून श्रीनगर ते दिल्ली तर दुपारी 12 वाजता – श्रीनगर ते मुंबई अशी विमान सेवा असणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडिया बुधवार, 23 एप्रिल रोजी श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी दोन अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहे. श्रीनगरला जाणारी आणि श्रीनगरहून येणारी आमची इतर सर्व उड्डाणे वेळापत्रकानुसार सुरू राहतील. या क्षेत्रांमध्ये 30 एप्रिल 2025 पर्यंत कन्फर्म बुकिंग असलेल्या प्रवाशांना एअर इंडिया मोफत रीशेड्युलिंग आणि रद्द केल्यास पूर्ण परतफेड देखील देत असल्याची घोषणा एअर इंडियाकडून करण्यात आली आहे. तर अधिक मदतीसाठी, कृपया ०११ ६९३२९३३३, ०११ ६९३२९९९९ या क्रमांकावर आमच्या संपर्क केंद्राशी संपर्क साधा.असेही आवाहन करण्यात आले आहे.

दोन्ही उड्डाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

श्रीनगर ते दिल्ली – सकाळी 11:30.
श्रीनगर ते मुंबई – दुपारी १२:००
या उड्डाणांसाठी बुकिंग आता सुरू आहे.

https://www.youtube.com/watch?v=tc51ivr6mmi

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.