एवढं मोठं बजेट, पण कुंभमेळ्यासाठी 1 रुपया नाही; जयंत पाटलांनी शहाजीराजेंच्या समाधीचाही मुद्दा क
जयंत पाटील: एवढे मोठे बजेट पण नाशिकच्या (Nashik) कुंभमेळ्याला (Kumbh Mela) एक रुपयाही दिला नाही. सरकार उदासीन असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले. नाशिक सांडपाणी प्रकल्पाच्या टेंडरवर सुहास कांदेंनी आक्षेप घेतला आहे. याला स्थानिक सेना भाजपचे राजकारण कारणीभूत असल्याचे पाटील म्हणाले. ओबीसी महामंडळाला (OBC Corporation) केवळ 5 कोटी रुपये दिले. ओबीसींची घोर फसवणूक सरकार करत असल्याचे पाटील म्हणाले.
राज्यात कोर्टांमध्ये 55 लाख 66 हजार केसेस पेंडिंग
राज्यात कोर्टांमध्ये 55 लाख 66 हजार केसेस पेंडिंग आहेत. देशातील हे प्रमाण 12 टक्के आहे. कायदा व सुव्यवस्था राहूच नये यासाठी या विभागाला पैसा दिले जात नाहीत असेही पाटील म्हणाले. मुंबई हायकोर्टात 18 लाख केसेस पेंडिंग आहेत. कोल्हापूरच्या खंडपीठाला लवकर परवानगी द्यावी असेही पाटील म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागात 35 ते 45 टक्के ज्यादा दराने निविदा निघाल्या. जालना नांदेड रस्ता कामासाठी जमीन संपादित झाली नाही तरी निविदा मात्र काढल्या गेल्या. एवढी का घाई झाली होती. काही कंपन्यांनी सरकारची गौणखनिजची रॉयल्टी बुडवल्याचे जयंत पाटील म्हणाले.
कंत्राटदारांच्या आत्महत्या होण्याची शक्यता, शिवेंद्रराजे या सगळ्यांची बीले द्या
NHAI ने 43 टक्के कमी दराने निविदा दिल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यात मात्र 35 टक्के जादा दराने काम दिले गेले आहे. 90 ते 95 टक्के स्पेशिफिकेशन सेम आहे. चीफ फायनान्स अधिकारी बच्छाव हे निवृत्त होवूनही ते तिथंच काम करतात. त्यांना का काढले जात नाही. कंत्राटदारांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे असे पाटील म्हणाले. शिवेंद्रराजे या सगळ्यांची बीले द्या असेही पाटील म्हणाले. कर्नाटकात छत्रपती शहाजीराजेंची साधी समाधी आहे. पण या समाधीसाठी पैसे द्या व चांगली समाधी बांधा असेही पाटील म्हणाले.
नाशिकमध्ये 2027ला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यंदा कुंभमेळ्याचं पर्व 18 महिन्याचं असणार आहे. त्यात 2027 च्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये म्हणजेच श्रावण महिन्यात तीन शाही स्नान होणार आहेत. नाशिक पुरोहित संघाची प्रयागराज इथं नुकतीच बैठक झाली. यात कुंभमेळाच्या तारखांना सर्व आखाड्यांनी मंजुरी दिली. त्यामुळं या तारखांची अधिकृत घोषणा नाशिकमध्ये पुरोहित संघ आखाड्यांचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीनंतर लवकरच करण्यात येणार आहे असं पुरोहित संघानं सांगितलं. दरम्यान, या नाशिकच्या कुंभमेळ्याच्या मुद्यावरुन जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
Devendra Fadnavis on Nana Patole : ‘जयंतराव आमचा विदर्भातील आवाज दाबणार असाल, तर…’ नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?
अधिक पाहा..
Comments are closed.