कधीकधी आम्हालाही शरद पवारांचा राग येतो, जितेंद्र आव्हाडांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर

शरद पवार, मुंबईवरील जितेंद्र अवाड: नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि.13) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केलं. शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदेंनी केवळ महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे कामच केले नाही, तर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला योग्य दिशा देण्याचे काम केले. दरम्यान, शरद पवारांनी शिंदेंची कौतुक केल्यानंतर ठाकरेंचे खासदार संजय राऊत चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. त्यांनी शरद पवारांवर टीका देखील केली. त्यानंतर आज (दि.13) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

आम्हाला कधी कधी राग येतो की हे असं का करतात : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवार साहेबांची उंची,महाराष्ट्रातील देशातील त्यांचं राजकारणातील स्थान, त्यांच्याशी विचारांची उंची ही अतुलनीय आहे.  शरद पवार या देशात असे राजकारणी आहेत की त्यांच्या मनात सूड,द्वेष कधीच निर्माण होत नाही.  आम्हाला कधी कधी राग येतो की हे असं का करतात.. पण ते का करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.  पवार साहेब तिथे जातील, असं वाटतं नाही, अशी महाराष्ट्रात अनेक उदाहरण आहेत. ज्या माणसाने पवार साहेबांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्ष, निशाणी पळवली सर्व केले पण त्यांच्यासोबत स्टेज शेअर करताना त्यांच्या मनात आसूड आणि चिड दिसत नाही. हे खरं तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे.

प्रामाणिकपणाने सांगतो शब्द जरा जपून वापरा

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, खोट्या पोलीस केसेस टाक, खोटे गुन्हे टाक, त्यांच्या राजकीय आयुष्य बरबाद करण्यासाठी काम कर, निधी बंद करुन टाक हे जे पाच दहा सुरु झालंय.  ते पवार साहेबांना स्पर्श सुद्धा करत नाही, पवार साहेब कुठल्या व्यासपीठावर जातात याचा कोणी विचारही करू नये. प्रामाणिकपणाने सांगतो शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेतो हा काय शब्द आहे का? असं काय मोठं केलंय त्यांनी, पण जेव्हा लढायची वेळ येईल.. त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त जास्त ॲग्रेसिव्ह हे शरद पवार साहेब असतील.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब हे उदाहरण आहे. राजकारण म्हणजे फक्त, सूड, द्वेष, संपवून टाका, मारून टाका असं नाही. आपण सर्व एकमेकांना भेटता, एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी, अजित पवार मला केबिनमध्येच घेणार नाही, पण मी अनेक पत्र पाठवून झालंय. एकनाथ शिंदे भेटल्यावर एकच सांगतात की परवा पण त्यांचा परवा कधीच येत नाही.  अमित शहा याला तडीपार बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती पण पवार साहेब बोलले, त्यांना जिथे वार करायचा तिथे ते करतात, असंही आव्हाड यांनी नमूद केलं.

https://www.youtube.com/watch?v=42qdtsjrktw

इतर महत्त्वाच्या बातम्या

Udaya Samant : ऑपरेशन टायगरची गरज नाही, शिंदे साहेबांचे काम ठाकरे गटातल्या नेत्यांना पटलं आहे; उदय सामंत काय म्हणाले?

अधिक पाहा..

Comments are closed.