कल्याण-बदलापूर तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेसाठी शनिवारी रात्री ब्लॉक
कल्याण-बदलापूरदरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक अवधीत कल्याण आणि कर्जत स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे, तर ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून बदलापूरसाठी शेवटची लोकल रात्री 11.51 वाजता, तर शेवटची कर्जत लोकल 11.30 वाजता सुटणार आहे.
शनिवारी मध्यरात्री 1.40 ते 3.40 वाजेपर्यंत अप आणि डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर ब्लॉक असेल. यासाठी लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ब्लॉकपूर्वी अप मार्गावर बदलापूर येथून सीएसएमटीसाठी रात्री 11.29 वाजता सुटेल. त्याचप्रमाणे ब्लॉकनंतर 29 नोव्हेंबरच्या पहाटे 5 वाजता ठाणे येथून कर्जत लोकल धावेल. कर्जत येथून मध्यरात्री 3.35 वाजता पहिली सीएसएमटी लोकल सुटेल. या ब्लॉक काळात अप दिशेकडील मेल/एक्सप्रेस गाडय़ांच्या मार्गात बदल केला जाणार असल्याने प्रवासी-नोकरदारांनी नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
Comments are closed.