महाराष्ट्रासह कल्याण डोंबिवलीत विरोधकांचा बँन्ड वाजला पाहिजे, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
मराठी : कल्याण डोंबीवली महापालिकेवर भाग झेड फडकवण्यासाठी आपण सज्ज आहोत. आजची गर्दी पाहून विरोधकांना ताप सर्दी झाल्या शिवाय राहणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जनतेने दाखवलं कोण खर कोण खोटं. काही जण बोलत होते की शिवसेना ठाण्यापुरती पण ही शिवसेना चंद्यापासून बांधापर्यंत पोहोचलीय. जे टीका करत होते ते या नगरपरिषदेत एका डिजिटवर थांबलेत. त्यांची आठवर गाठ पडल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेवंर केली.
अंबरनाथ बदलापूरमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष आले याचं मला समाधान आहे. सांगलीत उशिरा सभा केली मात्र उशीर झाला तरी लाडकी बहीण तेथून गेली नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक पद भूषवली. मात्र, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ पदवी मिळाली हे माझ्या साठी महत्वाची असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. काही लोकं मराठी माणसासाठी एकत्र आलो असे म्हणतात. त्यांनी एक काम सागांव? दोन वेळा या जनतेने त्यांना पाडले आहे. डांबराचे पैसे खिचडीचे पैसे का खाल्ले ? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. .
लाकडी बहीण योजना कधीही बंद होणार नाही
डोंबिवलीत क्लस्टर आणायची आहे. कारण क्लस्टरचा जन्म या एकनाथ शिंदे यांनी केला. लाकडी बहीण योजना कोणी मायका लाल आला तरी बंद होणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले.
जेव्हा बाळासाहेबांचे विचार हिंदुत्व काँग्रेसच्या दावणीला वाढण्याचं काम केलं गेले, त्यावेळी या एकनाथ शिंदेने सरकार पाडल्याचे ते म्हणाले. काही लोक evm घोटाळा निवडणूक आयोग म्हणून जनते न्याय मागण्याचा असल्याचे सागितले मात्र आम्हाला जनतेने निवडून दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
निवडणुकीत महायुती सर्वत्र दिसली मात्र महाविकास आघाडी कुठे दिसली नाही
निवडणुकीत महायुती सर्वत्र दिसली मात्र महाविकास आघाडी कुठे दिसली नसल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली. त्यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर सोडून दिले आहे. मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणतात. मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्रासह कल्याण डोंबिवलीत विरोधक ब्रँड म्हणतात त्यांचा बँड वाजवा असे शिंदे म्हणाले.
आमची लढाई खुर्ची साठी नाही आम्हाला ज्यांनी त्या खुर्चीवर बसवलं त्याचे काम करण्याचीची
आमची लढाई खुर्ची साठी नाही आम्हाला ज्यांनी त्या खुर्चीवर बसवलं त्याचे काम करण्याची लढाई आहे. अडीच वर्षात महाराष्ट्रात पुढे चालला आहे. मी रस्ते धुतले तेव्हा म्हणाले हे काम मुख्यमंत्र्यांचे आहे का? मग मुख्यमंत्री याचे काम घरात बसायचे आहे का ? असा सवाल करत ठाकरेंना टोला लगावला. एका मुलीने आत्महत्या केली म्हणून मला वेदना झाली आणि 100 टक्के फी मध्ये सवलत केली हे सरकार सर्वसामान्याचं आहे. देशात राज्यात महायुतीचे सरकार म्हणून या ठिकाणीही महायुतीचे सरकार आहे. आमचा पाय ब्रेकवर नाही तर आमचा पाय एक्सलेटर वर असतो तो दाबून विकास पुढे नेतो. महायुती अंतिम टप्प्यात आहे महायुती होणार आणि महायुती होणार आणि आपण जिंकणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आज निर्धार करा विकास आणि प्रगती आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आपल्यावर विश्वास करा, जिद्द मेहनत जिंकण्याची पहिली सीडी. 15 तारखेला महायुतीचा भगवा फडकवण्याची शपथ घ्या असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.