धोनी स्टाईल सेलिब्रेशनमागे दडलं होतं मोठं रहस्य! मॅच संपताच कार्तिक शर्माचा गौप्यस्फोट, म्हणाला
कार्तिक शर्मा गन सेलिब्रेशन : मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या विजयात 20 वर्षीय कार्तिक शर्माने जबरदस्त भूमिका बजावली. त्याने 40 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या जोरावर 54 धावा करत संघाला जिंकण्याच्या उंबरठ्यावर आणलं. त्याचं अर्धशतक खास ठरलं, कारण त्याने साजरा केलेला “गन सेलिब्रेशन” थेट एमएस धोनीच्या स्टाईलची आठवण करून देणारा होता.
धोनी स्टाईल सेलिब्रेशनमागचं कारण
आयपीएल 2026 मध्ये धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणाऱ्या कार्तिकने सांगितलं की, त्याने आधीच ठरवलं होतं की, आज जर मोठी खेळी झाली, तर सेलिब्रेशनही खासच असणार आहे. तो म्हणाला, “हे माझं पहिलं आयपीएल अर्धशतक आहे. मी आधीपासूनच ठरवलं होतं की अशीच सेलिब्रेशन करणार.”
अहो @grok काल मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर कार्तिक शर्माला गन सेलिब्रेशन केल्याबद्दल दंड होऊ शकतो का?🤔 pic.twitter.com/vCLqLBaVXA
— क्रिकसचिन (@Sachin_Gandhi7) ३ मे २०२६
शांत रहा, खेळत राहा…. कॅप्टनचा मंत्र
कार्तिकने पुढे सांगितलं की, त्याचा फोकस शेवटपर्यंत क्रीजवर टिकून राहण्यावर होता. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने त्याला साधा सल्ला दिला की, तुझा नैसर्गिक खेळ खेळ, काही वेगळं करण्याचा प्रयत्न करू नकोस.”
कर्णधार पाऊल उचलत आहे 🫡
वचन पूर्ण करणारा तरुण ✨देण्यासाठी हात जोडले @ChennaiIPL a 𝗯𝗶𝗴 𝘄𝗶𝗻 𝗶𝗻 𝗮𝗻 𝗲𝗽𝗶𝗰 𝗿𝗶𝘃𝗮𝗹𝗿𝘆 👏
🎥 रुतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्मा चेपॉक येथे नेतृत्व करताना 💛 – द्वारा @राजल अरोरा #TATAIPL | #खेळबिंदास | #CSKvMI |…
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) ३ मे २०२६
सामन्याचा टर्निंग पॉइंट
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीला संजू सॅमसन लवकर बाद झाला. त्यानंतर कार्तिक शर्मा मैदानात उतरला आणि कर्णधार गायकवाडसोबत 98 धावांची नाबाद भागीदारी करत सामना पूर्णपणे चेन्नईच्या बाजूला झुकवला. गायकवाडने 48 चेंडूत नाबाद 67 धावा करत ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला, पण कार्तिकच्या धडाकेबाज अर्धशतकानेच या विजयाची पायाभरणी केली. एकूणच, कार्तिक शर्माचा हा परफॉर्मन्स फक्त धावांपुरता मर्यादित नव्हता, तर धोनी स्टाईल सेलिब्रेशनमुळे तो क्षण चाहत्यांसाठी कायमचा लक्षात राहणारा ठरला.
क्लासिक प्रतिस्पर्ध्याला एक अपरंपरागत अंतिम स्पर्श! 🎬
🎥 @ChennaiIPL त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांवर दुहेरी पूर्ण करा #MI शैलीत 💛
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/VVAjldiiC0#TATAIPL | #खेळबिंदास | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/yeBWsXZ6Lu
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 2 मे 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.