आता थांबायचं नाय… जेमिमा रॉड्रिग्जला लागले वर्ल्डकपचे वेध, महिला संघ ताकद दाखवण्यासाठी सज्ज
इंग्लंडमध्ये जून-जुलै महिन्यांमध्ये होणाऱ्या आगामी महिला टी-20 विश्वचषकासाठी हिंदुस्थानने शनिवारी आपला संघ जाहीर केला. हिंदुस्थानचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे कायम ठेवण्यात आले आहे, तर स्मृती मानधना ही उपकर्णधारपदी असणार आहे. घरच्या मैदानावर झालेला एक दिवसीय वर्ल्डकप जिंकल्यामुळे हिंदुस्थानच्या महिला संघाचे मनोधैर्य उंचावलेले असून आता थांबायचं नाय… म्हणत स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने आणली ट्रॉफी जिंकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
एक वर्ल्डकप जिंकल्यामुळे आमची प्रेरणा अधिक वाढली आहे. आता आम्हाला एक नाही, तर दोन आणि त्याहून अधिक ट्रॉफी जिंकायच्या आहेत. अनेकदा मोठे यश मिळाल्यावर संघात समाधान किंवा सुस्तपणा येतो, पण आमच्या टीममध्ये उलट परिस्थिती आहे, असे जेमिमा म्हणाली.
व्हिडिओ | भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्सने सांगितले की, संघ गेल्या वर्षी पहिले एकदिवसीय विजेतेपद जिंकल्यानंतर कॅबिनेटमध्ये आणखी विश्वचषक ट्रॉफी समाविष्ट करण्यास उत्सुक आहे.
“मला वाटते की आता ही थोडी प्रेरणा आहे. आम्ही एक जिंकल्यामुळे आम्हाला दोन जिंकायचे आहेत,” जेमिमा म्हणाली.
“विश्वचषक जिंकल्यानंतर तुम्ही… pic.twitter.com/9EhnrqN2g2
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) ३ मे २०२६
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा 15 वा पदवी प्रदान सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार आणि स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यानंतर माध्यमांशी बोलताना जेमिमाने आणखी ट्रॉफी जिंकण्याचा इरादा स्पष्ट केला.

Comments are closed.