मुंबईतील नव्या मेट्रोचं उद्घाटन झालं पण जिन्याचं काम अर्धवट राहिलं, जागेची मालकी भाजप आमदाराकडे
मुंबई: काशिगाव मेट्रो स्थानकावर (Mumbai Metro) अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांनी काशीगाव मेट्रो स्थानकाला भेट देत पाहणी केली आणि पार्किंगची समस्या (Mumbai Metro) सोडवण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची असलेली जागा विकत घेण्याची मागणी केली. काशीगांव स्थानकात दोन जिन्यांची व्यवस्था करण्यात आली असली तरी सध्या केवळ एकाच जिन्याचा वापर सुरू आहे. पूजा पार्ककडे जाणाऱ्या दुसऱ्या जिन्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. यामुळे गर्दी वाढून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.(Mumbai Metro)
प्रवासी संख्येच्या तुलनेत सध्याची व्यवस्था अत्यंत अपुरी ठरत असून, भविष्यात गर्दी आणखी वाढल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दुसरा जिना तातडीने सुरू करून पर्यायी मार्ग खुला करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज काशिगाव मेट्रो स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित एमएमआरडीए (MMRDA) अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करून दुसरा जिना लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.(Mumbai Metro)
दरम्यान, स्थानकावर पार्किंगची सुविधा नसल्यामुळे पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांच्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या समस्येवरही तातडीने तोडगा काढून योग्य पार्किंग व्यवस्था उभी करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. एकूणच, काशिगाव मेट्रो स्थानकावरील अपुऱ्या सुविधा आणि नियोजनाच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
Mumbai Metro : जागेबाबत सरनाईकांचा अन् फडणवीसांचा तो किस्सा चर्चेत
मिरा-भाईंदर आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या दहिसर ते काशीगाव मेट्रो (Dahisar Kashigaon Metro) प्रकल्पाचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, भाजप आमदार नरेंद्र मेहता (MLA Narendra Mehta) या सर्व नेत्यांनी या मेट्रो ट्रेनमधून (Metro Train) प्रवास केला. त्यांच्यासोबत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरे होते. यावेळी घडलेला एक प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना बोलताना प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आपल्या आजुबाजूला आहेत याचे भान राहिले नाही. त्यांनी गप्पांच्या ओघात मजेत बोलताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मिरा-भाईंदरमधील जमिनींचा उल्लेख केला. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आपल्या आजुबाजूला कॅमेरे आहेत, असे सांगत त्यांना सावध केले. (Maharashtra Politics news)
दहिसर ते काशीगाव या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनावेळी राजकीय वातावरणात हलकाफुलका रंग भरला गेला. मेट्रो प्रवासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात रंगलेला मिश्किल संवाद चर्चेचा विषय ठरला. दहिसरहून काशीगावकडे मेट्रोने प्रवास करत असताना प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलताना हसतच एका विषयाला हात घातला. “मिरा-भाईंदरमध्ये 30 टक्के जागा नरेंद्र मेहता यांची आहे. त्यापैकी 10 टक्के जागा ते मला द्यायला तयार आहेत”, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. यावर उपस्थित सर्व नेत्यांमध्ये एकच हशा पिकला. प्रताप सरनाईक बोलत असताना मागून नरेंद्र मेहता त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, थट्टामस्करीच्या मूडमध्ये असलेले प्रताप सरनाईक हे बोलतच राहिले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थट्टामस्करी सुरु असतानाच प्रताप सरनाईक यांना सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला. , “आपण चकाला चकाला करु, आणि येथे हे सगळं आपलं रेकॉर्ड करतील,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी वातावरण आणखी रंगतदार केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकला. दरम्यान, दहिसर–काशीगाव मेट्रो मार्गाच आज उद्घाटन झाले. तसेच काशीगाव मेट्रो स्थानकाचं आमदार नरेंद्र मेहता यांची जागा आल्याने जिन्याचे काम रखडले आहे. मेहता यांची कंपनी अधिक मोबदला मागत असल्याचे म्हटले जात आहे. हाच धागा पकडत प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच हा मिश्किलपणे टोमणा मारत नरेंद्र मेहता यांचा गेम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.