Ketan Agrawal Case : “आम्ही मित्रांनी सरप्राइज पार्टी ठेवलीये, तू सियाला घेऊन ये…”; चेतनने केतनला फोन करून ‘असा’ रचला होता सापळा? वडिलांचा सर्वात मोठा खुलासा
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांनी (Ketan Agrawal Case) माध्यमांसमोर येत एकमेकांवर गंभीर दावे-प्रतिदावे केले आहेत. १४ आणि १५ जून रोजी केतन आणि मुख्य आरोपी चेतन चौधरी यांच्यात फोनवर संभाषण झाले होते, ज्यामध्ये चेतननेच केतनला सियाच्या वाढदिवसाच्या सरप्राइज (Ketan Agrawal Case) पार्टीचे निमित्त काढून लोहगडावर बोलावले होते, असा खळबळजनक खुलासा केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी केला आहे.(Ketan Agrawal Case)
Ketan Agrawal Case : ८ वाजून २० मिनिटांनी सियाला घेऊन लोहगडाकडे निघाला
१४ आणि १५ जून रोजी सियाने केतन आणि चेतन यांच्यात फोनवरून संभाषण करून दिले होते. त्यानंतर चेतनने केतनला फोन करून सियाच्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राइज देण्यासाठी आम्ही मित्र-मैत्रिणींनी लोहगडावर एका पार्टीचे आयोजन केले असून, तू सियाला १८ जून रोजी घेऊन ये असे सांगितले होते, अशी माहिती केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यानुसार केतन १८ जून रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सियाला घेऊन लोहगडाकडे निघाला होता आणि १० वाजून ४५ मिनिटांनी सियाची आई पूजा गोयल यांनी केतनची आई राखी अगरवाल यांना फोनद्वारे केतन दरीत पडल्याचे सांगितले, असेही त्यांनी सांगितले. याबाबातचे वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.
Ketan Agrawal Case : आम्ही सर्व मित्र-मैत्रिणींनी लोहगडावर एका पार्टीचे आयोजन केले
माध्यमांशी बोलताना केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी घटनेपूर्वीच्या काही दिवसांतील घडामोडींवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “१४ आणि १५ जून रोजी सियाने स्वतः केतन आणि चेतन यांच्यात फोनवरून बोलणे करून दिले होते. त्यानंतर चेतनने केतनला फोन केला आणि सांगितले की, सियाच्या वाढदिवसानिमित्त तिला ‘सरप्राइज’ देण्यासाठी आम्ही सर्व मित्र-मैत्रिणींनी लोहगडावर एका पार्टीचे आयोजन केले आहे. त्यामुळे तू १८ जून रोजी सियाला घेऊन तिथे ये.”
Ketan Agrawal Case :सियाला ट्रेकिंगची अजिबात आवड नव्हती
याच नियोजनानुसार, १८ जून रोजी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी केतन सियाला सोबत घेऊन लोहगडाकडे जाण्यासाठी निघाला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या अडीच तासांत म्हणजेच १० वाजून ४५ मिनिटांनी सियाची आई पूजा गोयल यांनी केतनची आई राखी अग्रवाल यांना फोन केला आणि केतन दरीत पडल्याची धक्कादायक माहिती दिली, असे विशाल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.दुसरीकडे, या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी आपल्या मुलीची बाजू मांडली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “सियाला ट्रेकिंगची अजिबात आवड नव्हती. केतनच तिला वारंवार ट्रेकिंगसाठी सोबत येण्याचा आग्रह करायचा आणि घेऊन जायचा. या संदर्भातील काही मेसेजेस देखील सियाने आम्हाला दाखवले होते.”
केतनच्या वडिलांनी केलेल्या खुलाशामुळे या हत्येचा कट किती आधीपासून आणि पद्धतशीरपणे रचला गेला होता, या पोलिसांच्या संशयाला बळ मिळत आहे. तर दुसरीकडे आरोपी बाजूने हा अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. दोन्ही बाजूंचे हे परस्परविरोधी दावे समोर आल्यानंतर आता पोलीस कॉल रेकॉर्ड्स (CDR) आणि मोबाईल मेसेजेसच्या तांत्रिक तपासाद्वारे या प्रकरणातील नेमके सत्य शोधून काढत आहेत.
Comments are closed.