सिया गोयलला घेऊन चेतन जोधपूरला का गेला होता? केतनला अंधारात ठेऊन जयपूर गाठलं अन्…

केतन अग्रवाल पुणे लोहगड मृत्यू प्रकरण: केतन अग्रवाल (Ketan Agrawal) मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांचा (Pune Police) तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून या प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तपास यंत्रणांनी पुरावे अधिक भक्कम करण्यासाठी घटनास्थळी सीन रिक्रिएशन केले.

शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी दोन्ही आरोपींना लोहगड किल्ल्याच्या (Lohagad Fort) पायथ्याशी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना केली. त्याचवेळी दोघांच्या मोबाईल फोनमधील कॉल रेकॉर्ड, लोकेशन हिस्ट्री आणि प्रवासाशी संबंधित माहितीचीही सखोल छाननी सुरू आहे. या तपासातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: राजस्थानमधील पळसानी गावचा रहिवासी चेतन

तपासादरम्यान चेतन चौधरीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबतही माहिती समोर आली आहे. चेतन हा राजस्थान (Rajasthan) राज्यातील जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यातील बिलारा परिसरातील पळसानी गावचा रहिवासी आहे. चेतनचे वडील पुण्यात गेल्या अनेक वर्षांपासून किराणा आणि ड्रायफ्रुट्सचा व्यवसाय करतात. ते आपल्या भावांसह पुण्यात स्थायिक असून व्यापार सांभाळतात. तर कुटुंबातील एक काका अजूनही मूळ गावी राहून शेतीची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या चेतन आणि सिया यांच्या मोबाईलमधील संवाद, लोकेशन आणि हालचालींचा तपशील तपासत असून, या प्रकरणामागील संपूर्ण कट उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: जोधपूर आणि उदयपूर दौऱ्याचाही तपास

तपासादरम्यान दोघांच्या प्रवासाबाबतही काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये चेतन सियाला जोधपूरला घेऊन गेला होता. त्या वेळी दोघांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवस मुक्काम केला होता. या काळात त्यांनी मेहरानगड किल्ला आणि इतर पर्यटनस्थळांनाही भेट दिली होती. यानंतर मे 2026 मध्ये सिया चेतनला उदयपूर येथे घेऊन गेली होती. विशेष म्हणजे, याच शहरात नोव्हेंबर 2026 मध्ये सिया आणि केतन अग्रवाल यांचा विवाह होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उदयपूर दौऱ्यामागील नेमका उद्देश काय होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलिसांचा या दौऱ्याबाबत तपास सुरु आहे.

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: चार बहिणींचा एकुलता एक भाऊ

चेतन चौधरी हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. कोरोना महामारीच्या काळात त्याच्या वडिलांच्या किराणा व्यवसायावर मोठा आर्थिक परिणाम झाला होता. कुटुंबाला आधार देण्यासाठी चेतन पुण्यात आला आणि वडिलांच्या व्यवसायात सक्रियपणे सहभागी झाला. चेतनचे वडील बाबूलाल सीरवी हे त्यांचे भाऊ उदाराम यांच्यासोबत अनेक वर्षांपासून पुण्यात किराणा व्यापार करतात. तर दुसरे भाऊ गुणेशाराम हे अजूनही मूळ गावी राहून शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत. व्यवसायातील मंदीच्या काळात कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी चेतनने पुण्यात येऊन व्यवसायाची धुरा सांभाळल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांकडून आरोपींचे डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा आणि प्रवासाशी संबंधित सर्व माहितीची बारकाईने तपासणी सुरू आहे. सीन रिक्रिएशननंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास अधिक वेगाने पुढे सरकत असून, या हत्येचा संपूर्ण कट आणि त्यामागील कारणे उघडकीस आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: क्रिकेटचे मैदान, भावाची मैत्री अन् 2004 कॉल्स; सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? मोठी माहिती समोर

Comments are closed.