चाकणमध्ये 3 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून, बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याचे प्रकरण ताजे असतानाच असाच एक प्रकार खेड तालुक्यातील चाकण भागामध्ये घडला आहे. चाकण परिसरात शुक्रवारी 3 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन आरोपीला दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मयत मुलाच्या आईने दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.