उद्धवसाहेबांनी उमेदवारी दिली, पण राणेसाहेबांनी…., कोकणात विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेताच बा
कोकण विधान परिषद निवडणूक 2026: राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी (Vidhan Parishad Election 2026) 18 जून रोजी मतदान होणार आहे. आज निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून, याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. यातच कोकण राजकीय वर्तुळातून एक सर्वांत मोठा आणि धक्कादायक ‘ट्विस्ट’ समोर आला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने (Bal Mane) यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात (District Collector Office) दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. बाळ माने यांच्या या धक्कादायक निर्णयामुळे कोकण विधानपरिषद निवडणूक आता बिनविरोध (Unopposed) होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेच्या जागेसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने बाळ माने यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, ऐनवेळी बाळ माने यांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील संपूर्ण रंगत संपली असून, अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Konkan Vidhan Parishad Election 2026: बाळ माने यांची प्रतिक्रिया
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळ माने म्हणाले की, “रायगड–रत्नागिरी–सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने मी शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी छाननी झाली, त्यात सहाच्या सहा उमेदवार वैध ठरले. आज अंतिम दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा. या निवडणुकीत 1018 मतदार आहेत. महाविकास आघाडी म्हणून आमचे संख्याबळ 200 च्या आसपास आहे. लोकशाहीत निवडणुका लढवल्या पाहिजेत, बिनविरोध निवडणुका होऊ नयेत, या मताचाच मी होतो. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांत मी मतदारांच्या भेटीच्या निमित्ताने काही जणांना भेटण्याचा प्रयत्न केला; परंतु अनेक जण तीर्थयात्रेला गेल्याचे माझ्या लक्षात आले.
मी फॉर्म भरताना सुद्धा चार फॉर्म भरले होते. एका फॉर्मला 10 सूचक लागतात. शिवसेना ठाकरे गटाचे मशाल चिन्हाचे 55 नगरसेवक या मतदारसंघात मतदार होते. मला 40 सह्या (स्वाक्षऱ्या) मिळाल्या. महाविकास आघाडीच्या इतर पक्षांकडे मी सूचक म्हणून सह्या मिळाव्यात अशी विनंती केली होती. मी अनेक वेळा मागणी करून देखील मला सह्या मिळाल्या नाहीत; त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आज मी आढावा घेतला तेव्हा पाहिलं की, घोडेबाजार सुरू झालेला होता, असं माझ्या कानावर आलं. घोडेबाजार करून निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचे नाही. त्यामुळे मी विचार केला आणि माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
बाळ माने पुढे म्हणाले की, नारायण राणे साहेबांसोबत माझे संबंध होते. लोकसभेत मी त्यांचे काम केले. विधानसभेत महायुतीच्या जागा वाटपात मला जागा मिळाली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी दिली. उद्धव साहेब, रश्मीताई, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत या सर्वांनी माझा मान सन्मान राखला. मला उपनेता म्हणून त्यांनी जबाबदारी दिली. या निवडणुकीला फॉर्म भरताना देखील उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी मला मार्गदर्शन केले. आमदार दळवी यांच्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीत मताचे विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल, असा माझा अंदाज होता. परंतु त्यांची उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्यांच्या मताचे विभाजन होणार नाही, असे दिसून आले, असेही ते म्हणाले. तर राणेसाहेबांनी सांगितले तर पुन्हा घर वापसी करणार का? याबाबत विचारले असता बाळ माने म्हणाले की, राजकारणात जर आणि तर याला काही अर्थ नसतो. मी राजकारणात बार्गेनिंग केलं असतं तर खूप कमावले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोकणातील पक्षनिहाय संख्याबळ – एकूण 831 (Konkan Vidhan Parishad Election 2026)
शिवसेना शिंदे गट – 236
भाजप – 151
राष्ट्रवादी – 63
शिवसेना ठाकरे – 55
काँग्रेस – 50
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.