गणेशोत्सवात मुंबईला जायचं अन् दंगल घडवायची हाच जरांगेंचा प्रोग्राम; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरो

लक्ष्मण हॅक ऑन हँड्स जरेंग पाटील: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजासोबत मुंबईकडे कूच करणार आहेत. यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळलं. त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहेत. जरांगे पाटील यांनी जी तारीख निवडली ती गणेशोत्सवाची आहे. याच दरम्यान गणेशोत्सवात मुंबईला जायचं आणि दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील यांचा असल्याचा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती करत जरांगे पाटील यांना अंतरवालीतच उपोषण करू द्या. पण महाराष्ट्रात सणासुदीचे वातावरण जाळपोळ करण्याचा डाव जरांगे पाटील यांना करायचा तो प्रयत्न रोखावा, अशी मागणी देखील हाके यांनी केली. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर लक्ष्मण हाके हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.

…तर ओबीसी समाज प्रत्युत्तर देईल

महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे हा एकमेव कार्यक्रम शरद पवार (Sharad Pawar) आणि जरांगे पाटील यांचा आहे. जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून प्रशासनाने वेगळा निर्णय घेतला तर त्याला ओबीसी समाज प्रत्युत्तर देईल, असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मंडल आयोगाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी असून ओबीसींना वेड्यात आणि मुर्खात काढण्याचा प्रयत्न शरद पवार पक्षाचा असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

जरांगेंवर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, मनोज जरांगेंची भाषा चिथावणीखोर आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबलं पाहिजे. बेकायदेशीर मागणी करत असताना त्यांचे लाड का केले जातात? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर जरांगे पाटील यांनी थोडासा अभ्यास करून हिंदी विषयाचे अवलोकन करावे, असा सल्ला देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिला आहे. आता लक्ष्मण हाके यांच्या आरोपांवर मनोज जरांगे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=eo15vexals8

इतर महत्त्वाच्या बातम्या

Parinay Fuke On Manoj Jarange: मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हातात, भाजपच्या परिणय फुकेंचा हल्लाबोल; म्हणाले…..

Radhakrishna Vikhe Patil : मराठ्यांना आरक्षण द्यायला पवारांचा विरोध, त्यांना जाब का विचारत नाही? राधाकृष्ण विखे पाटलांचा मनोज जरांगे यांना प्रश्न

आणखी वाचा

Comments are closed.