प्रसाद लाड मनोज जरांगेंना भेटले, लक्ष्मण हाके संतापले, म्हणाले, ‘पक्षाच्या जीवावर बेडकासारख्या
Prasad Lad Meet Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांवर राजकीय चिखलफेक करणाऱ्या भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची काल भेट झाली. या भेटीवरती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे आणि प्रसाद लाड (Laxman Hake and Prasad Lad) यांच्यावरती हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, प्रसाद लाड यांनी काम करावं हॉटेल चालवालं राजकारण्यांचा आणि पुढाऱ्यांचा फायदा, घेऊन त्यांनी अंबानींच्या पुढे जावं, त्यामध्ये आमचं दुमत असण्याचं कारण नाही. पण आरक्षण जरांगे पाटलांची मागणी वाद, जरांगे पाटलांचा समावेश ओबीसी समाजामध्ये झाल्यानंतर ओबीसींचं झालेलं नुकसान यातली काही काडीची अक्कल आहे का? प्रसाद लाड यांना असं म्हणत हाकेंनी लाड यांचा एकेरी उल्लेख केला आहे.(Laxman Hake and Prasad Lad)
Laxman Hake and Prasad Lad: तुझं नॉलेज काय आहे? तू तोंड कुठे घालतो
पुढे हाके म्हणाले, काय अक्कल आहे प्रसाद लाडांना,काय अनुभन आहे प्रसाद लाड यांचा, हॉटेल चालव आणि हॉटेलच्या एखाद्या शिष्टमंडळावर तू जा, तुझं ज्ञान काय? तुझं नॉलेज काय आहे? तू तोंड कुठे घालतो आहे. आणि पुन्हा म्हणतोय की, मी जातीसाठी मात खायला तयार आहे. मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, पहिल्यांदा तू ज्या पक्षाच्या जीवावर टून-टून बेडकासारख्या उड्या मारतोय ना? त्या पक्षाला विचार माधवनं काय केलं, ओबीसीने काय केलं, भटबामणांच्या पार्टीला गावगाड्यातल्या वाड्या वस्त्या तांड्यावरती कोण घेऊन गेलं. त्यामुळं तू नुसत्या काय ते ग्रामीण भागामध्ये म्हणतात आयत्या पिटावर रेघोट्या मारणं, भाजप वाढवण्यासाठी, मोठी करण्यासाठी कोण खपलंय, कोण माणसं होतं, याचा थोडा अभ्यास वाढवं, तुला काय कळणार हॉटेल व्यावसायिकाला म्हणून मी हॉटेल व्यवसायिक म्हणालो असंही पुढे लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.(Laxman Hake and Prasad Lad)
Laxman Hake and Prasad Lad: तू हॉटेल चालवणारा, झाडू पोछा मारणारा
त्या जरांगे पाटीलकडे जस्टीस येऊन गेले, सचिव येऊन गेले, अटर्नी जनरल येऊन गेले, मुख्यमंत्री, मंत्री येऊन गेले, एकनाथ शिंदे येऊन गेले, तरी त्याला फरक पडला नाही, आणि तू हॉटेल चालवणारा, झाडू पोछा मारणारा तुझ्याने तो काय फरक पडत असतो का?त्यामुळे लाडांनी आपलं जे काही क्षेत्र आहे, आणि तुम्ही काय एक लाख लोकांना रोजगार दिलाय का? तुम्हाला नोबेल पुरस्कार दिला जावा, शांततेचा इतक्या मोठ्या लोकांना रोजगार दिला, एवढा महान व्यक्ती त्याची लिस्ट जाहीर करा, काहीही बोलायचं राव, असंही संतापन लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.
आमचा गैरसमज झाला आहे, भाजपनं ओबीसींचं आरक्षण संपवलं आहे. या प्रश्नाचं उत्तर प्रसाद लाड यांनी द्यावं किंवा सरकार चाललणाऱ्या प्रसाद लाडांच्या नेत्यांनी द्यावं. आमचं ओबीसींचं आरक्षण गेलंय हा आमचा आरोप भाजपवर आहे. हा आमचा गैरसमज नाही. समज आहे. त्याचे सगळे पुरावे आम्ही लाडांना देतो, असंही पुढे लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांनी ओबीसी लोकसंख्येच्या आकडेवारीवर केलेल्या विधानाचा समाचार घेत हाके म्हणाले, “जरांगेला अक्कल नावाचा प्रकार नाही. ओबीसीची आकडेवारी ही १९३१ च्या इंग्रजांच्या जातनिहाय जनगणनेच्या (Castewise Census) बेसवर आधारित आहे” नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर घासून-पुसून आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मंडल आयोग देशभरात लागू झाला आहे, असे सांगत जरांगे पाटील आणि प्रसाद लाड या दोघांनाही त्यांनी ‘बेअक्कल’ म्हटले. “जरांग्या खुळखुळ्या तुला अक्कल नावाचा प्रकार नाही…1931 च्या कास्ट व्हाईस सेन्सेसच्या आधारावर आकडेवारी सांगितली जाते.. त्याला 1960 च्या लोकसंख्येचा बेस आहे…नऊ जेजेसच्या खंडपीठा समोर तावून सलाखून मंडल आयोग लागू झाला आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने झाला आहे. देशभरातल्या प्रत्येक राज्यात इम्प्लिमेंट झालाय. बेअक्कल माणसे एकत्र झाल्यावर असेच आरोप करणार…..मुख्यमंत्र्यांची आयमाय काढणाऱ्याकडून काय अपेक्षा करायच्या..आम्हाला महाराष्ट्रातील ओबीसी, भटका विमुक्त एकत्र करायचा आहे.. राजकारणाच्या जोरावर ओबीसीच्या अन्नात माती कालवण्यात यासारखे माणसं जात आहेत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आम्हाला धडा शिकवायचा आहे, असंही हाकेंनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.