अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्क
नाशिक: अघोरी पूजा आणि महिलांच्या शोषणाने महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाची व्याप्ती आता अधिकच वाढत चालली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’ने (SIT) जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर अवघ्या काही दिवसांत तक्रारींचा पाऊस पडला असून, खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनाही कोट्यवधी रुपयांना लुटल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे. (Nashik Crime News)
हेल्पलाईनवर १०० हून अधिक फोन कॉल्स
SIT ने खरात विरोधात माहिती देण्यासाठी दोन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १०० हून अधिक फोन कॉल्स या क्रमांकावर आले आहेत. यात प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर (अहमदनगर) भागातील नागरिकांचा समावेश आहे. अनेक महिलांनी फोन करून खरातने केलेल्या अत्याचाराची आणि फसवणुकीची माहिती पोलिसांना दिली आहे.(Nashik Crime News)
५० रुपयांचे खडे विकले लाखांना!
तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने ‘रत्न’ आणि ‘मौल्यवान खडे’ देण्याच्या नावाखाली लोकांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. बाजारात जेमतेम ५० रुपये किंमत असलेले दगड आणि खडे तो ‘चमत्कारी’ असल्याचे सांगून १ लाख ते २ लाख रुपयांना विकत असे. अशा प्रकारे त्याने शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
राजकीय नेते आणि सेलिब्रिटीही जाळ्यात
धक्कादायक बाब म्हणजे, खरातच्या जाळ्यात केवळ सामान्य नागरिकच नाहीत, तर नाशिक आणि आसपासच्या जिल्ह्यातील अनेक बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटी अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीय प्रगती आणि भविष्यातील संकटे टाळण्यासाठी अनेक नेते खरातकडे जात असत. भविष्याच्या नावाखाली खरातने या बड्या व्यक्तींकडूनही मोठी रक्कम उकळली आहे. काही सेलिब्रिटींना त्याने विधींच्या नावाखाली लुबाडल्याचे बोलले जात आहे.
महिलांच्या तक्रारींमुळे खरातच्या अडचणी वाढल्या
केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर अनेक महिलांनी हेल्पलाईनवर संपर्क साधून खरातने केलेल्या शारीरिक शोषणाबाबत तक्रारी केल्या आहेत. अघोरी पूजा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली त्याने महिलांवर अत्याचार केल्याचे आता स्पष्ट होत आहे. या तक्रारींच्या आधारे पोलीस आता अधिक ठोस पुरावे गोळा करत आहेत.
भोंदू बाबा अशोक खरातबाबत आणखी एक खुलासा
अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्यांन खरात बेजार झाला होता. दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. उत्तेजक (शक्तिवर्धक) औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय निर्माण झाला आहे. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. डॉक्टर भक्ताने वेळीच उपचार करून जीव वाचवला. आजही एका हाताची हालचाल मर्यादित, भुवईत बदल दिसून येत असल्याची माहिती आहे. उत्तेजक औषध घेणं खरातच्या जीवावर बेतलं होतं. तपासातून महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Comments are closed.