पंढरपुरात दिवाळीच्या तोंडावर गॅसचा ठणठणाट
दिवाळीचा सण तोंडावर आला असताना पंढरपूर शहरात गॅस सिलिंडरच्या टंचाईने नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे. घराघरांत दिवाळी फराळाची तयारी सुरू असतानाच, गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना रस्त्यावर उतरून रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. शहरातील शिवबा काशीद चौक येथील एचपी गॅसविक्री केंद्रावर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शिवबा काशीद चौकातील एच.पी. गॅस विक्री केंद्रावर सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होत असून, सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सणासुदीच्या काळात गॅसची मागणी वाढणार हे अपेक्षित असतानाही पुरेसा साठा आणि नियोजन का केले जात नाही, असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
Comments are closed.