महादेव मुंडे प्रकरणी पुन्हा नव्याने तपास होणार; पंकज कुमावत परळीमध्ये दाखल, हालचाली वाढल्या
महादेव मुंडे मृत्यू प्रकरण: महादेव मुंडे खून प्रकरणात (Mahadev Munde Death Case) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नेमणूक केलेली एसआयटी काल (04 ऑगस्ट) परळीमध्ये दाखल झाली. घटनास्थळावर तब्बल साडेतीन तास एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी या घटनेची माहिती घेतली.
काल (4 ऑगस्ट) दिवसभर महादेव मुंडे प्रकरणाचा जुना तपास बघितल्यानंतर आता पुन्हा एकदा या तपासाला नव्याने सुरुवात होणार आहे. या घटनेमध्ये महादेव मुंडे यांचा खून झाला, त्यादरम्यानचे कॉल रेकॉर्ड तपासण्यावर एसआयटीचा भर असेल. हे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतरच या घटनेवेळी परिसरात कोण कोण होते, याची माहिती समोर येऊ शकणार आहे. याआधीच मुंडे कुटुंबीयांकडून काही पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे देखील सीडीआर तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणानंतर अलीकडच्या काळात झालेल्या घडामोडी-
2 ऑगस्ट- महादेव मुंडे प्रकरणात आरोपी असलेला गोट्या गित्ते याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाडांना धमकी दिल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ परळी जवळील मालेवाडी रेल्वे पटरी वरचा होता.
3 ऑगस्ट- गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकांनी मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली असल्याचा खळबळजनक आरोप माध्यमांसमोर केला.
3 ऑगस्ट- महादेव मुंडे खून प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेले एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत हे बीडमध्ये दाखल झाले
3 ऑगस्ट- पंकज कुमावत यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली यानंतर बीड एलसीबीकडून महादेव मुंडे खून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली.
3 ऑगस्ट- रात्री महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची एक्स वर पोस्ट करत माहिती दिली.
3 ऑगस्ट- अंजली दमानिया यांनी गोट्या गित्ते जे वाल्मीक कराडला दैवत मानतात ते म्हणतात माझ्यावर खोटे आरोप लावू नका अशी एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये गोट्यावर बीड,पुणे,परभणी, लातूर अशा चार जिल्ह्यात 16 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले.
4 ऑगस्ट- एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत हे परळीमध्ये महादेव मुंडे प्रकरणाची माहिती घेण्यासाठी दाखल झाले.
महादेव मुंडे मृत्यू नेमकं प्रकरण काय?
20 ऑक्टोबर 2023 च्या संध्याकाळी महादेव मुंडे यांनी 6 वाजता ट्युशनवरुन मुलांना घरी सोडले. त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले. गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात 7.10 मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले. आझाद चौकात मित्राला भेटले. आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वाजता आढळून आली. ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते अशी कुटुंबीयांनी माहिती दिली. याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुकसह आणखी काही कागदपत्रं होती.ही मोटरसायकल सापडली. मात्र महादेव मुंडे कुठे होते हे माहिती नाही. या मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या. यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती, तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता.
महादेव मुंडे यांचा गळा चिरलेला, हातावर, गालावर, पाठीवर वार-
21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांची मेहुणे सतीश फड यांना फोन आला.हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला. मात्र तो फोन स्विच ऑफ आला. त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली. मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितले. महादेव मुंडे यांचा गळा चिरलेला होता आणि गळा कापलेला होता. त्याचबरोबर हातावर, गालावर, पाठीवर वार करण्यात आले होते. महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मी कलेक्शनचे साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आम्ही आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला.
https://www.youtube.com/watch?v=mgs2gcpmqf8
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.