पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
मुंबई : राज्यातील 29 महापालिकांसाठी (Mahapalika) आज महानगरांमध्ये मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. मात्र, बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाणे यांसह अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. त्यावरुनआता विरोधी पक्षातील नेत्यांनी ओरड सुरू केली असून स्थानिक मतदान केंद्रावरील लोकही व्हिडिओच्या माध्यमातून भूमिका मांडत आहेत. त्यातच, पुणेसोलापूर, मुंबई आणि जालन्यासह काही ठिकाणी बोगस मतदार पकडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सोलापुरात कर्नाटकमधून गाड्या भरुन मतदान आणल्याचा दावा समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 चे उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वतः महादेव वाडी अंद्री या परिसरात एका खासगी गाडीतून ग्रामीण भागातून काही लोकांना मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. नाना भानगिरे हे शिवसेना पुणे शहरप्रमुख आहेत, त्यांनी स्वत: प्रभाग क्रमांक ४१ महादेववाडी अंद्री या प्रभागातील अंद्री चौक येथे बोगस मतदान पकडले आहे आहेत. तसेच, संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
जालन्यात बोगस मतदार ताब्यात
जालन्यातील प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जिन परिसरामध्ये एका मतदाराने बोगस मतदान केल्याचा संशय मतदान प्रतिनिधींनी केला आहे. या संशयावरून संबंधित मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संशयित मतदाराची सध्या पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे, खात्री झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांची सांगितल. संशयित मतदाराने दुसऱ्या नावावर मतदान केल्याचा आरोप मतदान प्रतिनिधींनी केला असून मधुकर देठे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित मतदाराचे नाव आहे. दरम्यान संशयित मतदाराने कोणत्या नावाने मतदान केलं आहे, याची खात्री संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडून घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
कर्नाटकातून गाड्या भरुन आणले मतदार
सोलापुरातील प्रभाग 14 मध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. एमआयएमकडून बोगस मतदानासाठी कर्नाटकातून गाड्या आणल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे. जवळपास दोन हजार मतदार बोगस मतदानासाठी आणल्याचा आरोप समाजवादी कडुना करण्यात आला. मात्र, हे बोगस मतदार समाजवादी पक्षाकडून पकडल्यानंतर बोगस मतदार माफी मागून निघून गेल्याचा दावाही समाजवादीचे उमेदवार रियाज लेथ यांनी केला आहे.
बोरिवलीत गेरू गार्डने पकडले बोगस मतदार आयडी
बोरिवली प्रभाग क्रमांक 10 मध्ये भगवा गार्ड यांनी फेक मतदार आयडी पकडले आहेत. भाजपकडून बनावट मतदार आयडी वाटले जाऊन मतदानासाठी लोकांना आणले जात आहे, त्याशिवाय भाजपकडून मतदान स्लिप दिल्या जात आहेत असा आरोप भगवा गार्ड यांच्याकडून करण्यात आला. त्यावर मतदान केंद्रावर आक्षेप घेण्यात आला आणि त्यानंतर स्थानिक आमदार मनीषा चौधरी त्यासोबतच भाजप पदाधिकारी यांच्यासोबत गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
भांडुपमध्ये गोंधळ
मुंबईच्या भांडुपमधील आदर्श नगर प्रभाग क्रमांक 114 मध्ये शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मतदान केंद्रावर समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्यात बाचाबाची झाली आणि गोंधळ उडालात्यानंतर आता पोलिसांकडून वातावरण शांत करण्यात आले.
हेही वाचा
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
आणखी वाचा
Comments are closed.