मोठी बातमी! 32 जिल्हा परिषदसह 336 पंचायत समितीच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदत वाढ


महाराष्ट्र निवडणूक २०२६ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात (स्थानिक संस्था निवडणूक) एक महत्वाचे बातमी समोर आली आहे. राज्याच्या 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी (Voter List) प्रसिद्ध करण्याच्या मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत 27 ऑक्टोबरपर्यंत होती. आता सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

दरम्यानमतदार याद्यांमध्ये दुबार नाव असल्यास ते शोधून त्या संदर्भात आवश्यक कारवाई तातडीने करण्याचे ही निर्देश दिले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात मतदार यादीमध्ये शेकडो, हजारोंच्या संख्येने नावे दुबार असल्याच्या तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोग त्या संदर्भात गांभीर्याने कारवाई करत असल्यास दिसून येत आहे. राज्यात मतदार यादीतील घोळावरुन राजकारण तापलं असून विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांनी 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे, निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित होत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता निवडणूक आयोग त्या संदर्भात गांभीर्याने कारवाई करत असल्यास दिसून येत आहे.

व्हॅट बुध Election Commission : मविआ इफेक्ट? निवडणूक आयोगाकडून दुरुस्ती

-जि.प. आणि पं.समित्यांच्या अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस मुदतवाढ

– 27 ऑक्टोबरची होती मुदत, आता 12 नोव्हेंबरला अंतिम मतदार याद्या

– 32 जि.परिषदा व 336 पंचायत समित्यांसाठी होणार आहे निवडणूक

– मतदार याद्यांतील दुबार नावे डिलिट करण्याच्या आयोगाच्या सूचना

– सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतदारयाद्या अपडेट करण्याच्या सूचना

Election Commission : 1 नोव्हेंबरला मुंबईत विरोधकांचा मतचोरी संयुक्त मोर्चा निघणार

राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून आपला आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. 1 नोव्हेंबरला विरोधक मुंबईत (Mumbai) निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात महाविकास आघाडीसोबतच (Mahavikas Aghadi) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) देखील सहभागी होणार आहे.

देशभरातील मतदार याद्या आणि मतदार यादीतील घोळ या संदर्भात विरोधकांकडून निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील दुरुस्तीची मागणी विरोधक करत आहे.एक नोव्हेंबरला मुंबईत विरोधकांचा मतचोरी संयुक्त मोर्चा निघणार आहेत या मोर्चाच्या निमित्ताने नाशिक मनसेकडून देखील पक्ष कार्यालयाच्या परिसरात बॅनर लावून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. सत्याचा मोर्चा संविधान वाचवण्यासाठी लोकशाही जगण्यासाठी असा आशय या बॅनरवर पाहायला मिळत आहे. नाशिक मधून देखील मनसेची जोरदार तयारी या निमित्ताने मतचोरी संयुक्त मोर्च्याच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

हेही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.