विधीमंडळ समित्यांची घोषणा, भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती, कोणाकोणाची वर्णी?
महाराष्ट्र कॅबिनेट बैठक मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (25 फेब्रुवारी) महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन 2024-2025 या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule), कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि भाजप विधीमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर (Randhir Savarkar) यांच्या संमतीनं या समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशातच भाजपच्या नेतृत्वाखाली नवे नियुक्त सदस्यांची नियुक्ती आज करण्यात आली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती, कोणाकोणाची वर्णी लागली?
सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्ष पदी पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातील भाजपचे नेते राहुल कुल (Rahul Kul) यांची वर्णी लागली आहे. तर पंचायत राज समितीच्या अध्यक्ष पदी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे-पाटील (Santosh Danve) यांची वर्णी लागली आहे. तर आश्वासन समितीच्या अध्यक्ष पदावर रवी राणा यांची, तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष पदी नारायण कुचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती कल्याण समितीवर राजेश पाडवी, तर महिला हक्क व कल्याण समितीवर मोनिका राजळे या अध्यक्ष राहणार आहे. इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे, मराठी भाषा समिती पदावर अतुल भातखळकर, विशेष हक्क समितीवर राम कदम, धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर श्रीमती नमिता मुंदडा, आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्ष पदावर सचिन कल्याणशेट्टी हे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहे.
विविध समित्यांचे अध्यक्ष:
- सार्वजनिक उपक्रम समिती: राहुल कुल
- पंचायत राज समिती: संतोष दानवे-पाटील
- आश्वासन समिती: रवी राणा
- अनुसूचित जाती कल्याण समिती: नारायण कुचे
- अनुसूचित जमाती कल्याण समिती: राजेश पाडवी
- महिला हक्क व कल्याण समिती: मोनिका राजळे
- मराठी भाषा समिती: अतुल भातखळकर
- विशेष हक्क समिती: राम कदम
- धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समिती: नमिता मुंदडा
- आमदार निवास व्यवस्था समिती: श्री. सचिन कल्याणशेट्टी
शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्याला किती सदस्यांची नियुक्ती?
दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्यांची आज घोषणा करण्यात आली असून यात भाजपच्या 11 समित्यांवर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील समित्यांचे वाटप अद्याप झाले नसल्याचे पुढे आले आहे. विधानसभा अध्यक्षांनी विविध समित्यांच्या संदर्भात नव्या नियुक्त्या सर्व पक्षीयांकडून होत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. तर मंत्रिपद हुकलेल्या भाजप आमदारांचे समितीच्या मार्फत राजकीय पुनर्वसन केलं जाणार आहे. सोबतच ज्येष्ठतेनुसार समित्यांचे वाटप झाल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला 11 समित्या, तर शिवसेनेच्या वाटेला 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला 5 समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसकडून अद्यापही विधिमंडळ समितींबाबत घोषणा झालेली नाहीय. तर दोन्ही पक्षांकडून समितींबाबत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधीमंडळाच्या एकूण 29 समित्या असतात, त्यातील महायुतीच्या फाॅर्म्युल्यानुसार भाजपच्या वाटेला 11 समित्या आल्याची सूत्रांची माहिती आहे.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.